करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आदिनाथवर पाटलांचा दबदबा ; आमदार पाटलांनी जबाबदारी स्वीकारली तर दुसऱ्या पाटलांना निष्ठेचे फळ

करमाळा – विशाल (नाना) घोलप 


श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर एक हाती सत्ता मिळवल्यानंतर कारखान्यावर निवडीसंदर्भात पहिली बैठक पार पडली. सदरच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी आमदार नारायण पाटील यांची तर उपाध्यक्षपदी मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक महिंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सदरच्या निवडीपूर्वी इतर काही नावे चर्चेत असल्याचे दिसून येत होते. परंतु अखेर उपाध्यक्ष पदासाठी पाटील यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम लागला. महेंद्र पाटील हे मोहिते पाटील यांचे निकटवर्ती असून सदर निवडीत सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाल्याचे दिसून आले.

श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात या निवडणुकीत पाटील गटाने २१ जागी विजय मिळवत सदर कारखान्यावर ताबा मिळवला आहे. मागील आठ वर्षांपासून सदरचा कारखाना बंद असल्याने निवडणूक होईल का किंवा त्यावर लढण्यास कोण इच्छुक असेल का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु पाटील गटाकडून नारायण पाटील तर शिंदे गटाकडून स्वतः संजयमामा शिंदे हे मैदानात उतरले. दोघांनीही धाडसाने उतरल्याने सभासद व इतर कार्यकर्त्यांचेही मनोधर्यात वाढलेली दिसून आली. त्यामुळे भलतीच रंगत या निवडणुकीत आली होती.

निवडणुका पूर्वी जगताप गटाने उघडपणे पाटील यांना पाठिंबा देत संधी देण्याचं आवाहन केलं होतं. तर छुप्या पद्धतीने जरी बागल या निवडणुकी प्रक्रियेत बाहेरून असले तरी त्यांनी जवळपास उघडपणे पाटील यांचीच बाजू कशा पद्धतीने निवडून येईल याकडे लक्ष दिले होते. त्यामुळे संपूर्ण निवडणुकीत दोन्ही गटाकडून बागल यांच्यावर मात्र एकही टीका करण्यात आली नव्हती. त्यामुळे बागल यांनी घेतलेल्या माघारीचा बागल गटाला फायदा झालेला दिसून आला. तर आता संपूर्ण एक हाती सत्ता मिळाल्यानंतर पाटील गटांनी सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत स्वतः नारायण पाटील यांनी अध्यक्ष होण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे इथून पुढे पाटील यांची कोणती रणनीती आदिनाथला अडचणीतून बाहेर काढेल याकडे लक्ष लागून राहिले आहे.

politics

इतर नावे होती चर्चेत …
निवडणुकांपूर्वी पासून आमदार नारायण पाटील हे अध्यक्षपदी विराजमान होणार अशा चर्चा असल्या तरी उपाध्यक्षपदी मात्र नवनाथ झोळ, डॉ हरिदास केवारे, संतोष खाटमोडे व दादा पाटील यांच्या नावाची चर्चा होती. यावेळी अध्यक्षपदी नारायण पाटील यांची नियुक्ती झाली. शिवाय एकमुखी एकमतान उपाध्यक्षही निवडण्यात आले. इथुन पुढे इतरांना संधी मिळ्ण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. निवड प्रक्रियेत नारायण पाटील यांचे सूचक श्रीमान चौधरी तर अनुमोदक विजय नवले यांनी काम पाहिले. तसेच महेंद्र पाटील सूचक दशरथ हजारे, अनुमोदन रविकिरण फुके यांनी केले. यावेळी अमोलसिह भोसले यांनी निवडणुक निर्णय अधिकारी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी काम पाहिजे निवड प्रक्रिया सकाळी साडे आकराला सुरु व साडे आकरा पर्यत संपली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE