करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अर्बनच्या निवडणुकीत म्होरक्याने मैदान सोडल्याने विरोधकांचा दारुण पराभव

करमाळा समाचार

दि करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करमाळा याची पंचवार्षिक निवडणुकीत नागरिक संघटनेने एकतर्फी विजय मिळवत संपूर्ण पॅनल मोठ्या बहुमताने निवडून आला आहे. तर विरोधी गटाकडून प्रमुख नेता समोर नसल्याने दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सदरच्या निवडणुकीत सुरुवातीला चर्चेत असलेल्या प्रा. रामदास झोळ यांनी निवडणुकीत माघार घेतल्याने मोठा धक्का विरोधी गटाला सोसावा लागला आहे.

सदरच्या निवडणुकीत सुरुवातीला प्रा. झोळ यांनी बॅंक व्यवहार बंद असल्याने नियम शिथिल करावेत व उमेदवारी अर्ज सर्वांना भरण्यासाठी मुभा द्यावी अशी मागणी केली होती. त्यांच्या विनंतीला अनुसरून प्रशासनाने ही सदरचे नियम शिथील केले होते व सर्वांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी होती. तरीही झोळ गटाकडून संपूर्ण पॅनल उभा करता न आल्याने त्यांनी सदर निवडणुकीतून माघार घेतल्याचे दिसून येते.

politics

तर कायम अर्बन बँकेवर सत्ताधारी असलेल्या नागरिक संघटनेला अपेक्षित असे आव्हान समोर उभे दिसून येत नव्हते. याशिवाय संपूर्ण पॅनल नसल्यामुळे संबंधित गटाला म्होरक्याही मिळाला नाही. त्यामुळे सर्वांचे वेगवेगळी चिन्हे व वेगवेगळ्या अजेंडा यामुळे नागरिक संघटनेला सदरची निवडणूक ही एकतर्फी होऊन बसली. सदरच्या निवडणुकीत अतिशय एकतर्फी विजय मिळवत पुन्हा एकदा नागरिक संघटनेने अर्बन ची सत्ता राखली आहे.

विजयी उमेदवार …
नागरिक संघटना जनहित पॅनल कडून कन्हैयालाल देवी, अनुज देवी, सुनील घोलप, कलीम काझी, जितेश कटारिया, यशराज दोशी, मोहिनीराज भणगे, अभिजीत वाशिंबेकर, प्रकाश सोळंकी, ताराबाई क्षीरसागर, मीना करंडे, प्रमिला जाधव, चंद्रकांत चुंबळकर, वंदना कांबळे हे विजयी झाले आहेत. तर भटक्या विमुक्त जाती जमाती मधून गोरख मच्छिंद्र जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE