करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सावधान !! बचत खातेच नव्हे तर ठेवीवरही सायबर चोरांचा डल्ला

करमाळा समाचार 

जसजशी यंत्रणा सुधारणा होत जात आहे लोकांसाठी घरबसल्या सोयी उपलब्ध केल्या जात आहेत. त्यावर सायबर चे गुन्हेगारी क्षेत्र ही वरचेवर अपडेट होत जात आहे असे दिसून येत आहे. नुकतेच करमाळा येथील महाराष्ट्र बँकेमधून ६.५६  लाख रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे खात्यातील रक्कम तर गेलीच शिवाय संबंधित व्यक्तीच्या बचत ठेव मधूनही पैसे काढून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्राहकांसह बँक कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.

मुळातच सामान्य लोकांना बँकेमधून सहजासहजी संपर्क साधाता यावा विविध कामे एका क्लिकवर व्हावीत एटीएम बंद करणे, चालू करणे व कर्ज प्रकरण तसेच ठेवी व ठेवीवर कर्ज यासारखी कामे घरबसल्या करता यावीत याशिवाय पैसे खात्यात पैसे वळवणे किंवा खात्यातून पैसे काढणे यासारखी कामे सहजासहजी व्हावीत यासाठी ऑनलाइन बँकिंगचा पर्याय बँकांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचाच गैरफायदा घेत आता सायबर गुन्हेगार अधिकचे अपडेट झाल्याचे दिसून येत आहेत.

politics

केवळ एक ॲप आपल्या मोबाईल मध्ये पाठवले जाते व बँकेने सदरचे ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले आहे किंवा त्या ॲप मध्ये माहिती भरण्याचे आवाहन केले जाते. त्या पद्धतीने संबंधित व्यक्ती हा बँकेची कुठलाही संबंध न ठेवता सदरची माहिती भरतो व जोपर्यंत माहिती भरली जाते तोपर्यंत जवळपास सर्वच डाटा व त्यातील काम करण्याची अधिकार हा व्यक्ती संबंधित चोरट्याला देऊन बसतो अशा वेळी बँकेच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये संबंधित चोर हे प्रवेश करतात. व त्याच्या नावावरील बचत खात्याच्या रकमेसह ठेवीच्याही रकमेची विल्हेवाट लावायला ते मोकळे होतात अशा पद्धतीने एका सुशिक्षित व्यक्तीच्या खात्यावर चोरट्याने डालना मारलेला करमाळ्यात निदर्शनास आले आहे.

विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने बँकेत जाऊन याबाबत कल्पना दिलेली असतानाही बचत ठेवीवरून पैसे कपात झाली. त्याच्या बचत ठेवीवर कर्ज काढल्याचे दिसून आले. यामुळे बँक कर्मचारीही संभ्रमात आहेत. याशिवाय संबंधित व्यक्ती पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याच्या प्रयत्नात आहे. तरी बँकेने या मध्ये सायबर क्राईम यांच्याशी निगडित असलेल्या विभागाकडे तक्रार केलेली आहे. त्यामुळे सध्या तरी संबंधित बँकेतून कट झालेल्या रकमेची थांबवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढे काय होते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

बॅंकेच्या संपर्कात या ..
संबंधित व्यक्ती हा बँकेत आल्यानंतर आम्ही त्याचे एटीएम बंद केले होते व ऑनलाईन व्यवहार होऊ नये याची काळजी घेतलेली होती. परंतु नेमके कोणत्या पद्धतीने खात्या शिवाय ठेवीवर कर्ज काढले हे कळून आलेले नाही. तरी बँकेच्या वतीने पुढील प्रक्रिया राबवली गेली असून संबंधित खाते गोठवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरी सायबर क्राईम विभाग यावर काम करत आहे. संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर नेमके काय घडले हे समजू शकेल तर असा प्रकार लक्षात आल्यात तात्काळ बॅंकेशी सपर्क साधावा. याशिवाय बॅंकेशी संपर्क न करता कसलेही ॲप इंस्टॉल करु नका.
– योगेश ठाकरे, व्यवस्थापक, महाराष्ट्र बॅंक , करमाळा

मला भरपाई मिळावी…
माझ्या मोबाईलवर ठेवायची संदर्भात बँकेतून फोन आल्याचे सांगितले मी ॲप इन्स्टॉल केल्यानंतर लगेच माझ्या खात्यातील एक लाख ५६ हजार रक्कम कपात झाली. यावेळी मी बँकेत जाऊन माझे खाते थांबवण्याचे सांगितले होते. पण तरीही दुसऱ्या दिवशी माझ्या बचत ठेवीवर कर्ज काढण्यात आले. दोन टप्प्यांमध्ये पाच लाख रुपये काढले गेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने सहा लाख ५६ हजार रुपयांचा फटका बसलात लक्षात आले. खात्यातील रक्कम चुकीने गेली असली तरी बचत ठेवीवर रक्कम बँकेच्या चुकीने गेली आहे. त्यामुळे त्यांनी सदरची भरपाई केली पाहिजे.
अंकुश भानवसे,ग्राहक.

अशी होते लुट ..
सायबर गुन्हेगार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या नावाने एक लिंक शेअर करतात व जो व्यक्ती ती लिंक ओपन करतो त्याला विचारलेली माहिती भरत राहिल्यास संपूर्ण मोबाईलचा डाटा हा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचतो. त्यातून हे फसवणुकीचे प्रकार करु शकतात. मोबाईल डाटा गेल्यानंतर बँकेचे मेसेज तसेच इतर माहिती त्यांच्याकडे थेट पोहोचते. त्यावरून ते खात्यातील रक्कम स्वतःकडे वळऊ शकतात. शिवाय बँकेत ऑनलाइन बँकिंग प्रणाली ते स्वतः वापरू शकतात. यामुळे यासाठी ग्राहक व बँकेच्या परवानगीची गरज भासत नाही. त्यामुळे रक्कम संबंधित व्यक्ती हा स्वतःकडे घेऊ शकतो. यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE