अखेर माढा करमाळा येथील रिक्त जागेवर प्रांत म्हणून आव्हाड यांची नियुक्ती
करमाळा समाचार
मागील बऱ्याच दिवसांपासून रिक्त असलेल्या माढा, करमाळा उपविभागीय अधिकारी जागेवर अखेर श्रीमती जयश्री आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या उपजिल्हाधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी कार्यरत होत्या. लवकरच त्या कुर्डूवाडी येथील कार्यालयाचा पदभार स्वीकारतील. यापूर्वी दोन वेळा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

संबंधित ठिकाणी प्रभारी अधिकारी असल्यामुळे अपेक्षित असे वेगात काम होताना दिसत नव्हतेm तर जमिनींचे वाद व विविध कामे यासह मुलांचे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले, जात पडताळणी व इतर बाबी मार्गी लागण्याची गती कमी झाली होती. त्यात आता नव्याने अधिकारी नेमल्यामुळे कामाची गती वाढण्याची शक्यता आहे.

बरेच दिवसांपासून जागा रिक्त असल्यामुळे कामाचा भार वाढलेला होता व विविध संघटना व पदाधिकाऱ्यांकडून सदरचे जागेवर कायमस्वरूपी नियुक्ती करावी अशी मागणी होत होती. सदरच्या नियुक्तीमुळे करमाळा तालुका माढा तालुक्यातील बरेचसे प्रश्न मार्गी लागतील.