आगार प्रमुखांनी आता तरी जागे झाले पाहिजे !! – करमाळ्यात “हम करे सो कायदा” चालणार नाही
करमाळा समाचार
तालुक्यासाठी दहा नव्या बस आल्यानंतर यंत्रणा सुधारेल अशी अपेक्षा होती. परंतु त्या ठिकाणी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांचा नियोजन शून्य कारभारामुळे आजही प्रवाशांना तितक्याच हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. एखाद्या खासगी कंपनी सारखं तिथलं नियोजन सुरू असून केव्हाही कोणतीही गाडी जाण्यापासून थांबवली जाते व प्रवाशांचे हाल केले जातात असे दिसून आले आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून करमाळा आगाराकडे वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष केलं जात आहे हे दिसून आलेल होत. या ठिकाणी तब्बल 2019 पासून एकही नवीन एसटी न आल्याने जुन्या व खराब झालेल्या गाड्या येथे धावत होत्या. तर पुणे, मुंबई व लांबच्या पडल्याच्या गाड्या असो किंवा जवळच्या या बस स्थानकाच्या बाहेर गेल्यानंतरच बंद पडाण्याची तर गावोगावी मध्येच बंद पडण्याची एक सवय करमाळ्याच्या बस मध्ये सुरू झाली होती. त्यात नागरिकांच्या अट्टाहासामुळे दहा बसेस करमाळ्याला मिळाल्या खऱ्या पण त्या व्यवस्थेतील काय बदल झालेला अद्याप दिसून येत नाही.
जिल्ह्यात मोजक्याच तालुक्यामध्ये सदरच्या नव्या बस दाखल झाल्या आहेत. त्यात करमाळा तालुक्याचा क्रमांक लागतो. त्यामुळे येथील परिस्थिती बदले असे वाटत होते. परंतु आजही जैसे थे परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे. सक्षम अधिकारी या ठिकाणी नसल्याने शिवाय अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर असलेले संबंध व त्यांना वाटत नसलेली भीती यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची मुजोरी वाढल्याचे नागरिकांच्या बोलण्यातून येत आहे. अधिकाऱ्याचे नेते मंडळी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक संबंध चांगले असल्याचा फायदा या ठिकाणी घेताना दिसत आहे. त्यामुळे इथे कोणालाच कसलीच किंमत देत नसल्याची ओरड सामाजिक कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे.

नुकतेच पुण्याकडे जाणारी पहाटेची गाडी बंद केल्याने प्रवाशांनी ओरड केली. तर चक्क ड्रायव्हर नसल्याने सोलापूर गाडी पाठवता आले नाही असं दिसून आलं. बस स्थानकावर लोक ताटकळत उभे असताना दोन दोन तास गाड्या पाठवल्या जात नाहीत. तर अचानक गाडी बंद केल्यामुळे विद्यार्थी वृद्धांचे हाल होत आहे. अचानक गाड्या रद्द झाल्याने पर्यायी व्यवस्था करणे ही कठीण झाले आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत लोकांना वेळेवर जाण्याची घाई असते. परंतु खासगी कंपनी सारखी गाडी जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत पाठवली जाणार नाही किंवा अचानक आम्ही केव्हाही कोणतेही बदल करू अशा पद्धतीने इथला कारभार सुरू आहे. लोकांनी तक्रारी केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केली जाते. परंतु यंत्रणा सुधारता येत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी वेगळे विभाग निवडून त्या ठिकाणी कामाला जावे असे सूचना ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दिल्या जात आहे.
या सर्व प्रकारांना बाबत येथील आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी फोनवरून बोलण्याचे टाळले आहे. या संदर्भात लवकरच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते वैयक्तिक जाऊन विभाग प्रमुखांची बोलणार आहेत त्यांना याची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
