माहेरची यात्रा अखेरची ठरली ; भिषण अपघातात बहिण, भावासह भाऊजय ठार
करमाळा समाचार
गावातील यात्रेच्या निमित्ताने गावाकडे आलेल्या बहिणीला माघारी जात असताना काहीतरी घ्यावे म्हणून बायको आणि बहिणीसह करमाळ्याला जाऊन आल्यानंतर गावाच्या दिशेने जात असताना मोटर सायकल व कार गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरची घटना वीट करमाळा रस्त्यावर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. तर कार गाडी पलटी झाल्याने त्यातील सहा ते सात जण जखमी आहेत.

अपघातात मोटारसायकल हनुमंत केरु फलफले वय ३५, कांचन केरु फलफले वय ३०, दोघे रा. अंजनडोह, ता. करमाळा व स्वाती शरद काशीद, वय २५ ता. सराफवाडी, ता. इंदापूर असे मयतांची नावे आहेत.
तालुक्यातील वीट येथील भुजबळ वस्तीजवळ इनोवा कार क्रमांक (एम एच ०४ ईएफ १००१) व मोटरसायकल (क्रमांक एम एच ४५ यु ३८०५) यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला भीषण अपघाताची तीव्रता एवढी होती की दोन्हीही गाड्यांचा चकना चोर झाला आहे इनोव्हा गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पडली तर मोटरसायकल दूरवर जाऊन आदळली त्यामुळे मोटरसायकल वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे सदरची तिघे हे अंजनडोह येतील रहिवासी असून ते करमाळा येथे आले होते त्यामध्ये स्वाती काशीद या जत्रेच्या निमित्ताने माहेरी आल्या होत्या त्यांना करमाळा येथे झाले आहेत.

