करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी अमरजीत साळुंके

करमाळा समाचार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी अमरजीत साळुंके यांची राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाकडून जाहीर झालेल्या नावाद्वारे निवड झाली आहे. श्री साळुंके हे शेतकरी कुटुंबातील असून माजी उपसभापती व सोलापूर जिल्हा दूध संघाचे माजी संचालक कै.शंकरराव (बापू ) साळुंके यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे. ग्रामीण भागातील जनतेशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे, ते स्वतः उच्च शिक्षित कृषी पदवीधर असून करमाळा तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सतत आघाडीवर असतात.

सर्वोदय प्रतिष्ठानचे सचिव, शिवरत्न ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष ,
युवक काँग्रेस चे करमाळा तालुका अध्यक्ष, भाजपा चे तालुका सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी चांगले काम केले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा देत धैर्यशील मोहिते पाटील यांचे सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत माढा लोकसभा आणि करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने काम केले होते.
मोहिते पाटील परिवारातील अत्यंत विश्वासू आणि जवळचा सहकारी म्हणून अमरजीत साळुंके यांच्याकडे पाहिले जाते.

ads

महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी त्यांची निवड जाहीर केली. साळुंखे यांच्या निवडीमुळे करमाळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री आ.जयंत पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. नारायण आबा पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील यांनी त्यांचे निवडीनंतर अभिनंदन केले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE