करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

अवैधरीत्या उजनीतुन चोरीच्या वाळुची वाहतुक दोघांवर गुन्हा दाखल ; तहसिलदार शिल्पा ठोकडे यांची कारवाई

करमाळा समाचार

उजनी जलाशयातून वाळू उपसा करून वाहतूक करत असताना टेम्पो सह चालकावर कारवाई केली आहे सदरची कारवाई मध्यरात्री दोन च्या सुमारास केली आहे. याप्रकरणी गोरक्षनाथ यशवंत ढोकणे वय 40 वर्ष व्यवसाय नोकरी ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) रा शितल अपार्टमेंट टेंभुर्णी ता माढा जि सोलापुर यांनी तक्रार दिली.

याबाबत अधिक माहीती अशी की, दि.13/10/2025 रोजी पहाटे 02/15वा. तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी फोनव्दारे कळविले की, मौजे कंदर येथिल उजणी जलाशयाचे पात्रातुन अवैद्य वाळु उपसा करून तिची वाहतुन काही लोक करित आहेत. तरी तुम्ही पोलीसांचे मदतीने त्यांचेवरती कारवाई करणेबाबत कळविल्याने पोलिस पथक लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील नेमणुकीचे पोकाँ/2109 निकम, पोहेकाँ/1627 लोकरे, पोकाँ/2008 गुटाळ तसेच कंदर गावचे महसुल सेवक नागेश पवार व दोन पंच असे आम्ही कंदर ते भांगे वस्ती जाणारे रोडवर मरिआई लक्ष्मी मंदिराजवळील पाण्याचे टाकीजवळ थांबले होते.

यावेळी भांगे वस्तीकडून कंदर कडे एक टैम्पो येत असताना दिसला सदर टेम्पोस मी व पोलीसांनी हाताचा इशारा करुन थांबविला व सदर टेम्पोचे पाठीमागील हौद्यामध्ये पंचासमक्ष पाहिले असता त्यामध्ये वाळु असल्याचे आम्हाला दिसले ती वेळ पहाटे 03/45 वा.ची होती. सदर टेम्पो चालकास त्यांचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितिन हनमंत कदम वय 46 वर्षे रा. कंदर ता. करमाळा असे असल्याचे सांगीतले. सदर इसमास टेम्पोमध्ये भरलेली वाळु कोठुन आणली आहे. या बाबत विचारणा केली असता त्याने सदरचा टेम्पो सुनिल उर्फ भाऊ दिलीप माने रा. कंदर ता. करमाळा यांचा असुन त्याचे सांगणे वरुन उजणी जलाशयातुन कव्हे रोपळे पाणी पुरवठा विहिरी जवळुन भरल्याचे सांगितले.

ads

त्याचे कडुन 2,10,000/- टाटा कंपनिचा 407 मँडेलचा पांढरे रंगाचा त्यावर छत्रपती शासन असे लिहिलेले टेम्पो आर.टी.ओ.पासिंग नं. एम. एच. 24 जे. 7477 त्याचे पाठीमागिल पिवळे रंगाचे हौद्यात अंदाजे सव्वा ब्रास वाळु भरलेला कि.अं. 2,10,000/- येणे प्रमाणे वरिल वर्णनाचा व किंमतीचा वाळुने भरलेला टेम्पो मिळुन आल्याने तो चालकासह पोलीस ठाणेस आणला आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE