E-Paperताज्या घडामोडी

मेळाव्यांना परवानगी तर शाळा बंदच केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनलॉक-4 ची नियमावली जाहीर

करमाळा समाचार –

लॉकडाऊनबाबत राज्यांवर निर्बंध प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. स्थानिक लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी राज्यांना केंद्र सरकारशी सल्लामसलत करावी लागणार आहे. तर केंद्राने अनलॉक 4 घोषणा करताना राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, मेळाव्यांना 21 सप्टेंबरपासून सशर्त परवानगी शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्‍लासेस 30 सप्टेंबरपर्यंत बंदच..

केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी अनलॉक-4 साठीची नियमावली जाहीर करताना लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणली पण विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्‍लासेस 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र, 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, संबंधित वर्गांमधील विद्यार्थी स्वेच्छेने शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा- महाविद्यालयांमध्ये जाऊ शकतील. मात्र, त्या शाळा आणि महाविद्यालये प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर असणे गरजेचे आहे.

त्याशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची लेखी परवानगी घ्यावी लागेल. ऑनलाईन वर्ग किंवा टेलिकाउन्सिलिंग आणि संबंधित कामकाजासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची सरकारे 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलावण्याची परवानगी देऊ शकतील.

शिथिलता आणलेल्या नियमानुसार 7 सप्टेंबरपासून मेट्रो टप्प्याटप्प्याने धावू शकणार आहे. त्याशिवाय, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि मेळावे आयोजित करण्याला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, संबंधित मेळावे आणि कार्यक्रम 21 सप्टेंबरपासून होऊ शकतील. मात्र, त्यामध्ये 100 व्यक्तीच सहभागी होऊ शकतील.

तसेच राजकीय, सामाजिक आणि इतर कार्यक्रम, मेळाव्यांना उपस्थित राहणाऱ्यांना फेस मास्क अनिवार्य असेल. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. त्या कार्यक्रम, मेळाव्यांवेळी थर्मल स्कॅनिंग, हात धुण्याची आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागेल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE