ताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

श्री. मनोज पाटील यांच्या नंतर “या” आहेत सोलापूर ग्रामीण च्या पोलिस अधिक्षक ; अधिक माहीती जाणुन घ्या

करमाळा समाचार 

सोलापूर येथील ग्रामीण पोलीस चे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेवर नुकतीच साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह महिलांची होणारी छेडछाड हा मुद्दा तेजस्वी सातपुते यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला होता. याबाबत विविध महाविद्यालयांशी चर्चा करून, विद्यार्थिनींचे मेळावे घेऊन त्यामध्ये स्वरक्षण कसे करायचे, याबाबत धडे दिले जात होते. संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबवून सातारा जिल्हा पोलीस दल तुमच्या पाठीशी आहे, हे त्यांनी दाखवून दिले होते. मुलींच्या संरक्षणाशिवाय सातारा जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करणे, गुंडांना हद्दपार करणे अशा अनेक कारवाया करून सातपुते यांनी जिल्हा भयमुक्त होण्यास मदत केली होती. 

कोरोना पार्श्वभूमीवर उत्कृष्ठ काम …

सातारा जिल्ह्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केला. वैद्यकीय क्षेत्रासह पोलीस दलापुढे हे एक मोठे आव्हान होते. सातारा जिल्ह्यात लॉकडाउन जारी झाल्यानंतर सातारा शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवून सर्वसामान्य नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्याचे शिवधनुष्य सातारा जिल्हा पोलीस दलाने तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लीलया पेलले. ही जबाबदारी पार पाडत असताना सातपुते यांनी पोलीस कर्मचार्‍यांना दिलासा देत कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. तरीही काही पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यातच काही पोलिसांचा मृत्यू झाला. अशा कठीण प्रसंगी तेजस्वी सातपुते पोलिसांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्या

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE