करमाळ्यातील ७० शिक्षकांचा होणार सन्मान ; पंचायत समीतीच्या वतीने होणार गौरव
करमाळा समाचार – सुनिल भोसले
” शाळा बंद शिक्षण सुरू” या उपक्रमांतर्गत कोविड 19 च्या काळात उत्कृष्टपणे ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या करमाळा तालुक्यातील 70 शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यांना शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

आज प्रातिनिधिक स्वरूपात आज 6 शिक्षक, 1 केंद्रप्रमुख व 1 विषयतज्ञ यांना पंचायत समिती करमाळा चे सभापती मा. गहिनीनाथ (आप्पा) ननवरे यांचे हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपसभापती दत्तात्रय सरडे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, विस्तार अधिकारी अनिल बदे, बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम व पुरस्कारप्राप्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षक उपस्थित होते.