नरभक्षक बिबट्याला मारणारे डॉ धवलसिंह पाटील यांचा पंचायत समिती येथे सत्कार
प्रतिनिधी सुनिल भोसले
करमाळा तालुक्यात दशहत निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर अकलुजचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिवाची पर्वा न करता 15 फुटांच्या अंतरावरून तीन गोळ्या झाडल्या आणी बिबट्याला ठार केले आणी वनविभागाला जे जमले नाही ते करून दाखवले. त्यामुळे वनविभागाला मारण्यास यश आले. करमाळा तालुक्यातील तीघाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला वनविभाग व पोलिस प्रशासक रात्रीचा दिवस करत होते.

त्यामुळे नागरिकांना आधार मिळाला होता पुढील घात होऊ नये म्हणून वेळोवेळी पोलिस प्रशासन व वनविभाग सुचना देत होते आणी वेळप्रसंगी उपाशी पोटी सुद्धा जनतेच्या संरक्षणासाठी पळत होते बिबट्या चलाक असल्याने चक्वा देत होता. त्यामुळे त्यांना बिबट्याला पकडण्यासाठी व मारण्यासाठी अपयश येत होते शेवटी अनेक प्रयत्नाने खाजगी शार्प शुटर डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांना परवानगी दिली आणी वनविभागाला बिबट्या मारण्यास यश आले म्हणून करमाळा येथे पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे व जिल्हा परिषद सदस्य बिभिषण आवटे, केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांच्या हस्ते शाल फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
