E-Paper

नुतन पोलिस निरिक्षकांनी घेतली बैठक ; नागरीक व व्यापाऱ्यांनी वाचला अडचणींचा पाढा

प्रतिनिधी । जामखेड –

जामखेड शहरातील वाहतुक तसेच पार्किंग समस्या आणि नागरीक व व्यापा-यांच्या सुरक्षा विषयक समस्या आणि निराकरण करण्याच्या कामाला आपण प्राधान्य देणार असल्याचे जामखेड पोलीस स्टेशनला नव्याने रूजू झालेले पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.

शहरातील महावीर मंगल कार्यालयात व्यापारी आणि समाजसेवक यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत
जामखेडला नव्याने रूजू झालेले पोलीस निरिक्षक गायकवाड बोलत होते. पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षित आहे या बद्दल त्यांनी नागरीक व जनतेची मते जाणून घेतली. जामखेड तालुक्याचा विस्तार आणि शहराची संख्या पाहता पोलीस बळ अल्प आहे, त्यासाठी जो पर्यत व्यापारी नागरिक पुढे होऊन पोलीस प्रशासनाला मदत करत नाहीत, तो पर्यत ठोस पावले उचलता येत नाहीत, यासाठी व्यापा-यांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही लावणे, तसेच आपापल्या भागात , पेठेत व्यापा-यांनी एकत्र येऊन, रात्री रखवालदार ठेवणे, पार्किंग च्या बाबतीत काळजी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थीतांनी आपले मत मांडले. विविध विषयांवर चर्चा झाली. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अगोदर पार्किंगची पर्यायी व्यवस्था व्हावी अशी मागणी करताना नंतरच बाकीच्या समस्यांना लक्ष घालावे असे आवाहन केले. शहरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या चोऱ्यांचे सीसीटिव्ही फुटेज देऊनही अद्याप दुकानदारास मुद्देमाल मिळाला नाही, मेन रोडवरील अतिक्रमण पाहता निम्म्याहून कमी रस्ता वापरात आहे. तसेच बीड रोड कॉर्नर सारख्या ठिकानांवर बरेच टवाळखोर मुले, रस्त्याला अडथळा करत मोटारसायकल आडवी लावून उभी असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी सुनील जगताप म्हणाले अल्पवयीन मुलांकडे महागडी दुचाकी वाहने कुठून येतात ? यातली काही टुकार मुले रस्त्यावर उभी राहुन मुलींची छेड काढतात, याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे, यावेळेस मंगेश आजबे म्हणाले शेतकऱ्यांवर बऱ्याच वेळेस अन्याय होत आहे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये शहानिशा करून टिबल सीट वर कारवाई करावी, यावेळी आमित चिंतामणी यांनीही आपले मत मांडले. कृष्णा अाहुजा यांनी जयहिंद चौकामधील ग्रामपंचायतीचा ४ रिक्षाचा थांबा ठराव असताना ,आता तिथे पंधरा ते वीस रिक्षा उभ्या राहतात. याचा बंदोबस्त करावा, असे मत मांडले. संतोष नवलाखा यांनी तपनेश्वर रस्त्यावल लोक गाड्या लावतात. पार्किंग करतात, लोकांना जाता येत नाही , त्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. विकी घायतडक यांनी शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक मुतारी ची व्यवस्था करण्याची मागणी केली.

यावेळी उपस्थित सहायक पोलिस निरीक्षक महेश जानकर, नगरपरिषद चे अधिकारी शेळके तसेच पवन राळेभात, कापड असोशियनचे अध्यक्ष संजय कटारिया, मोबाईल असोशियशनचे सुनील जगताप , उमेश नगरे, ऋषिकेश चिंतामणी , अमोल तातेड , विकी सदाफुले , संतोष नवलाखा , अमोल लोहकरे, विशाल अब्दुले, सोमनाथ पोकळे, आनंद गुगळे, अनुराग गुगळे , कृष्णकुमार अाहुजा , डॉ. चंद्रशेखर नरसाळे, मनोज भंडारी , विजय अहुजा, तुषार बोरा, हरिश्‍चंद्र राळेभात, शिवकुमार डोंगरे, सलीम सय्यद , अरविंद पारख, विकी घायतडक , महादेव गव्हाणे , प्रशांत हिरवे , धनराज पवार, बजरंग सरडे , अजय अवसरे, अविनाश ढेरे, पिंन्टु बोरा, गोपनीय विभाग, संदीप राऊत आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE