E-Paperक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

ऑनलाईन कर्ज घेताय … सावधान तुमच्यासह तुम्ही इतरांनाही अडचणीत आणत आहात

करमाळा समाचार 

झटपट लोन किंवा कोणत्याही कागदपत्रांशिवाय मिळणारे ऑनलाइन लोन याच्या आमिषाला सध्या तरुण मुले बळी पडताना दिसत आहेत. प्ले स्टोर मधून इन्स्टॉल केलेल्या ॲप मोठ्या प्रमाणावर कर्ज देऊ केले जात आहे. घेतलेल्या कर्जावर चक्रवाढ व्याजदर लावली जात आहे. पण संबंधित व्यक्ती कर्ज फेडून नाही शकला तर त्याच्या संपर्कातील मोबाईलचे क्रमांक सर्वच ह्यात करून त्यांनाही त्रास दिला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ऑनलाइन थोडा पासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे.

प्ले स्टोअर मधून फक्त आधार कार्ड फक्त पॅन कार्ड यावरून लोन मिळवा म्हणून ॲप इन्स्टॉल केले जातात. त्या ॲप मधून दोन ते पाच हजारांची रक्कम लोन म्हणून दिली जाते. काही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यासोबत इतरही आटोमॅटिक जोडले जातात व प्रत्येकाची दोन ते पाच हजाराची रक्कम संबंधित व्यक्तीच्या अकाउंट मध्ये टाकली जाते व नंतर ती रक्कम भरण्यासाठी त्याच्या मागे तगादा लावला जातो. पण संबंधित व्यक्तीला ती रक्कम मिळण्याआधीच त्याचे व्याज व प्रोसेसिंग म्हणून मोठ्या प्रमाणावर कटिंग केली जाते. व आधीच रक्कम अकाउंटमध्ये जमा होते. त्याच्यानंतर सात दिवसापासून ते महिनाभरात पर्यंत रक्कम माघारी भरण्यासाठी मुदत दिली जाते. ती व्यक्ती रक्कम माघारी भरण्याची तयारी दर्शवत असतानाही त्याला चक्रवाढ पद्धतीने व्याज लावले जाते व संपूर्ण रक्कम भरण्यासाठी सांगितले जाते.

politics

जर ती व्यक्ती सदरची रक्कम भरुन नाही शकला तर ते आपल्या मोबाईल मध्ये ॲप इंस्टाल करताना आपण तेव्हा कॉन्टॅक्ट लिस्ट गॅलरी अशा बाबीला अलाऊ म्हणून त्याला मान्यता दिलेली असते. त्यामुळे तो आपल्या संपर्कातील सर्व क्रमांक त्याच्याकडे हॅक करून घेतो. त्यानंतर जर आपण स्वतःचा मोबाईल बंद ठेवला किंवा संबंधित व्यक्तीला पैसे देऊ केलेले देण्याचे टाळले तर ती संबंधित कंपनी प्रत्येकच संपर्क क्रमांकाला फोन लावून तुमचा मित्र आमच्याकडे कर्ज घेतलेले आहे व तुमचे नाव सांगितले आहे असे सांगून भीती दाखवतात व नोटीस काढली जाईल अशा पद्धतीने धमक्या देतात. त्यानंतर तरीही ती रक्कम माघारी न जमा झाल्यास हमरीतुमरी तसेच शिवीगाळ कर्जदारास सह इतर लोकांनाही करण्यात या कंपन्या विचार करत नाहीत. त्यामुळे कर्जदारास इतरांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

लहान शहरा पासून ते मोठ्या जिल्ह्यात पर्यंत या लोणचं लोन पसरले आहे. त्यामुळे तरुणही तसेच कमी वेळेत लोन मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे सर्वांनाच या पासून धोका असून कोणत्याही भूलथापांना बळी न पडता याच्या पासून सावध राहणे गरजेचे आहे. तरीही आपल्या बाबतीत असे काही घडले असल्यास शांत न राहता आपल्या शेजारील पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करावी. तसेच सायबर क्राईम कडे हा गुन्हा दाखल होईल अशा पद्धतीने कारवाई करावी. तर सहजासहजी लोन देणारे असले अप्लिकेशन आपल्या मोबाईल मधून आणि अनइन्स्टॉल करून सावध राहावे.

आता तुमच्या सोबत असे काही घडले असेल तर एक तर याबाबत तक्रार करा. त्यानंतर भिऊन त्याला पैसे देत बसू नका . जेवढे तुम्ही भराल तेवढे ते मागत राहतात. तर त्यानंतर तो संपर्क करत सगळ्यांना ताप देण्यास सुरुवात करतो. त्यापूर्वीच तुम्ही याबाबत सर्व जवळच्या व्यक्तींना कल्पना द्या व ज्या नंबरवरून फोन येईल तो संपर्क क्रमांक फक्त ब्लॉक करा. याने वाद वाढणार नाहीत आणि मानसिक त्रास होणार नाही. संबंधित व्यक्तीवर आपण बोलत असाल तर तो हुज्जत घालेल  व शिवीगाळ ही करेल त्यामुळे मानसिक ताण वाढेल त्यामुळे अशा लोकांना बोलण्यापेक्षा ब्लॉक करा. 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE