शिवसैनिकांनी मतभेद विसरुन कामाला लागा ; ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देसाईंचे आवाहन
सोलापूर – प्रतिनिधी
सध्या चालू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक शिवसैनिकांनी कामाला लागत भगवा फडकवून आपली ताकत दाखवून द्यावी “, असे आवाहन खा.शंभूराजे देसाई यांनी केले. सोलापूर जिल्हा दौ-यावर आले असता ते जिल्हा शिवसेनेचा आढावा बैठकीच्या दरम्यान बोलत होते.

यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, पुरुषोत्तम बरडे, वानकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलजा गोडसे, शिवसेना महिला आघाडी करमाळा तालुका प्रमुख वर्षा चव्हाण,रोहिणी नागणे, राणी तळेकर, आशा मोरे, शितल सावंत, काचंन मोरे आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .

पुढे बोलताना खा.देसाई म्हणाले की, शिवसैनिकांनी सर्व मतभेद विसरले पाहिजेत. सर्वसामान्याच्या कामांना, समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे त्यासाठी तळागाळात जाऊन सर्वसामान्यात मिसळून कामे करावीत असे आवाहन यावेळी केले. यावेळी महिला आघाडीच्या वतीने खा.देसाई यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वांचे आभार वर्षा चव्हाण यांनी मानले.