आनंदऋषी हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी यांचा सन्मान ; अद्ययावत सुविधांसह मोफत डायलिसिस सोय
करमाळा समाचार
अहमदनगर येथील आनंद ऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना कायम सहकार्य करून शासनाच्या वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल आनंद ऋषी हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी यांचा धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान व करमाळा तालुक्यातील मनसेच्या तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. ते खाजगी कामानिमित्त करमाळा येथे आले होते.

यावेळी बोलताना डॉ. भंडारी म्हणाले की, आनंद ऋषि हे नावाजलेले हॉस्पिटल असून याठिकाणी सर्व रोगांवर निदान केले जाते तरी शासनाच्या योजना ही या ठिकाणी आवर्जून राबवल्या जातात त्यामुळे गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होतो तरी धर्मवीर प्रतिष्ठानचेही काम चांगले असुन त्यांनी अशा पद्धतीच्या रुग्णांना मार्गदर्शन करावे. तरी या ठिकाणी डायलिसिस मोफत केले जाते. आधुनिक तत्रंज्ञान व अद्ययावत सुविधा असलेल्या ३८ प्रकारच्या वेगवेगळ्या मशीनच्या आहेत. गरीब व वारंवार डायलिसिस करावे लागणाऱ्या रुग्णांनी मोफत डायलिसिसचा लाभ घ्यावा.

यावेळी करमाळा शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी मा.अजिंक्य गुगळे, मा.स्वप्निल कवडे उपस्थित होते.