करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वाळु माफियांना मोठा झटका ; तहसिलदार शिल्पा ठोकडेंकडुन दोन ट्रकांवर कारवाई

करमाळा समाचार 

करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात कामकाजा निमित्ताने पुण्याच्या दिशेला जात असताना रस्त्यात बंद पडलेल्या ट्रक मुळे वाळू माफियाचं कारस्थान उघड पडलेलं दिसून आलं. सकाळी साडेसहाच्या सुमारास एक बंद तर दुसरी वाळू वाहतूक करत असताना ट्रक मिळून आली. त्यामुळे आठ ब्रास वाळू सह दोन ट्रक जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केली आहे.

सध्या निवडणुकांचे वातावरण असून प्रशासन निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त आहे. याचा फायदा उचलत वाळू माफिया पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं जिवंत उदाहरण दिसून आले आहे. निवडणुकीच्या कामानिमित्ताने तहसीलदार शिल्पा ठोकडे या पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान त्यांना रस्त्यात मध्ये बंद पडलेला ट्रक दिसून आला. त्यामध्ये वाळू असल्याचे कळाले.

politics

त्यावरून त्यांनी त्याला विचारल्यानंतर त्याने उडवा उडवी चे उत्तर दिले. तर त्या मागूनच दुसरा वाळू वाहत असलेला ट्रक त्याठिकाणी मिळुन आला. दोन्हीही ट्रक तहसीलदार ठोकडे यांनी ताब्यात घेतले व त्यांची विचारपूस सुरू आहे. पुढील कार्यवाहीसाठी सदरचे ट्रक हे करमाळ्याकडे पाठवले जात आहेत. तर पुढील कामकाजा निमित्ताने ठोकडे या पुण्याच्या दिशेने गेल्या आहेत.

यावेळी सर्कल संतोष गोसावी, तलाठी रामेश्वर चंदेल, पोलिस पाटील टाकळी सोमनाथ कुचेकर, पोलिस पाटील खातगाव सलीम मुलाणी, कोतवाल टाकळी मेहबुब सय्यद, कोतवाल कात्रज रहिम तांबोळी, पोलिस पाटील कात्रज सोमनाथ पाटील हे कारवाई पथकात असुन पुढील कारवाई साठी वाहन तहसिल कार्यालयाकडे नेण्यात येत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE