बसस्थानकात अर्धनग्न अवस्थेत एकाचे मृत शरीर आढळले ; पोलिस तपास सुरु
करमाळा समाचार
आज सकाळी करमाळा येथील बस स्थानक परिसरात एका अनोळखी व्यक्तीचे मृत शरीर मिळवून आले आहे. सदरच्या व्यक्तीचे ओळख पटलेली नसून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून सदरचे मृत शरीर हे पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे पाठवले आहे. सदरच्या मृताची ओळख पटल्यास करमाळा पोलीस ठाणे किंवा एपीआय जगदाळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित व्यक्ती हा अर्धनग्न अवस्थेत असून बस स्थानकातील कार्यालया शेजारी असलेल्या मोकळ्या वरांड्यात त्याचे मृत शरीर सकाळी मिळून आले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्याचे मृत शरीर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवून दिले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके कारण समजून येणार आहे.

परंतु त्यापूर्वी संबंधित व्यक्ती कोण आहे याबाबत माहिती मिळत नसल्याने सदर फोटो ओळख पटवण्यासाठी सोबत फोटो देत आहोत. ओळखीचा असल्यास करमाळा पोलिसांशी संपर्क साधावा.