दिव्यांग पित्याची खेळाडु मुलीसाठी धडपड ; देशपातळीवर जाईपर्यत दुर्लक्षीत
करमाळा समाचार
सोनीपत हरियाणा येथे पार पडलेल्या आशियाई चॅम्पियनशिप आर्चरी स्पर्धेमध्ये वैष्णवी किशोर पाटील हिने निवड चाचणीत यश मिळवले आहे. यानंतर ती चीन तपई येथे कॅडेट व युवा आशियाच्या चॅम्पियनशिपमध्ये २०२४ मध्ये इतर सहकारी खेळाडुंसह भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. शालेय स्पर्धा ते आंतराष्ट्रीय स्पर्धा पर्यत मजल मारताना शासना वैष्णवीला सुविधा व खर्च दिला नाही. आजतागायत वैष्णवीचा संपुर्ण खर्च हा कुटुंबीयांनी उचलला आहे. शासन अशा खेळाडुंवर लहान पणापासुन लक्ष देत नसल्याने याचाही फटका बसतो हे दिसुन येते सुदैवाने वैष्णवी डगमगली नाही व यश मिळवले.

चीन येथील स्पर्धा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. यासाठी सोनीपत हरियाणा येथे २३ ते २९ ऑगस्ट दरम्यान निवड चाचणी पार पडली. यामध्ये वैष्णवी ने पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश मिळवले आहे. वैष्णवीला सुरुवातीला मोडलिंब येथील आर्चरी कोच विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन मिळाले. तर सध्या ती सातारा येथील दृष्टी अकॅडमी येथे प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. वैष्णवीला शालेय शिक्षण देत असताना आर्चरी मधील आवड पाहून तिच्या वडिलांनी आतापर्यंत सर्व स्वखर्चातून तिला साहित्य पुरवले शिवाय तिला लागणारे मार्गदर्शन मिळवून दिले. शालेय क्रीडा स्पर्धांपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी कुटुंबाकडून तिला मोठी साथ मिळाली. तिचे वडील कुमार पाटील स्वतः अपंग असताना आपल्या मुलीला क्रीडा विभागात उज्वल यश संपादन करण्यासाठी पाठिंबा देत राहिले. त्याचेच हे यश आल्याचे दिसून येते.

तर आपण गुणी खेळाडुला मुकलो असतो …
शालेय शिक्षण ते आंतरराष्ट्रीय स्पर्धा यामध्ये शासनाच्या वतीने कसलेही सहकार्य झाले नसल्याचे या ठिकाणी दिसून आले. त्यामुळे अशा पद्धतीचे उदनमुख खेळाडू घडवण्यासाठी सरकार केवळ मोठ्या स्तरावर गेल्यावरच लक्ष घालते. पण लहानपणापासून अशा खेळाळून वरती त्यांचं लक्ष नसतं. त्यामुळे ऑलिंपिक सारख्या खेळांमध्ये भारतीयांच्या खेळाडूंची कामगिरी अपेक्षित अशी चमकदार होत नाही यातून दिसून येते. त्यामुळे वैष्णवी पाटील सारख्या खेळाडूंवर लहानपणापासून लक्ष शासनाने देणे गरजेचे आहे. वैष्णवीचे वडील सक्षमपणे सोबत उभे राहिले त्यामुळे ती तिथपर्यंत पोहोचू शकली. वैष्णवीच्या वडिलांनी मध्येच सराव थांबवला असता तर आपण एका खेळाडूला मुकलो असतो.