करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

फळ्यावर साकारली चिमणी… शिक्षकाची अप्रतिम कलाकृती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील जि.प. शाळा रावगाव येथील शिक्षक अनिल काळुंखे यांनी आपल्या कलागुणांची अनोखी झलक दाखवत फळ्यावरच सजीव भासणारी चिमणीची आकर्षक चित्रकला साकारली आहे. “जागतिक चिमणी दिन” निमित्त २० मार्च २०२६ रोजी तयार केलेले हे चित्र पाहून विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ भारावून गेले आहेत.

सदर चित्रामध्ये चिमणीचे बारकाईने केलेले रंगसंगती, पिसांची सूक्ष्म रचना आणि नैसर्गिक पार्श्वभूमी अत्यंत जिवंत भासते. फळ्यासारख्या साध्या माध्यमावर इतक्या कौशल्याने रंग भरून वास्तवदर्शी चित्र उभे करणे ही मोठी कला असल्याचे अनेकांनी व्यक्त केले.
या उपक्रमामागे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्याचा उद्देश असून, चिमणीसारख्या लुप्त होत चाललेल्या पक्ष्यांविषयी प्रेम आणि जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. शिक्षकांच्या या कलाकृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेबद्दल उत्सुकता वाढली असून शाळेत एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षकांच्या या कौशल्यपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा सर्जनशील प्रयत्नांमुळे शिक्षण अधिक रुचकर आणि प्रभावी बनत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE