२८ ग्रामपंचायतीत एकुण ८२.४६ टक्के मतदान ; कामोणेत सर्वात जास्त तर गोयेगावात सर्वात कमी टक्केवारी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीत आज मतदान प्रक्रिया पार पडली. जिंती गावातील किरकोळ बाचाबाची वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात एकूण ८३ बूथ च्या माध्यमातून २८ गावातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. २८ गावांची एकूण ८२.४६ टक्के मतदान पार पडले. यामध्ये १४ हजार महिला तर १७ हजार २५६ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गोयेगावात सर्वात कमी तर कामोनेत सर्वात जास्त टक्केवारी पहायला मिळाली.

प्रत्येक गावात पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आले होता. यामध्ये १२५ पोलीस कर्मचाऱ्यांसह ९० होमगार्ड व नऊ अधिकारी असे कार्यरत होते. मतदान केंद्रावर मोबाईलला बंदी असल्याने त्या ठिकाणी काटेकोरपणे नियमांची पालन करण्यात आले होते. वेळेत मतदान प्रक्रिया पार पडल्याने मोठ्या रांगा असल्याचे दिसून आले नाही. साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्वत्र मतदान पूर्ण झाले होते. सर्वत्र शांततेत मतदान पार पाडण्यात यश आले आहे. यावेळी निवडणूक सहनियंत्रण अधिकारी म्हणून तहसीलदार समीर माने, निवडणूक नायब तहसीलदार म्हणून विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले. तर २८ गावात २८ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिकारी कार्यरत होते.

करमाळा समाचार : वरकटणे (७५.९०), पोफळज (७९.४९), शेलगाव वा. (८०.००), दहिगाव (९२.००), खडकी (८१ .००), तरटगाव (८९.७८), कामोणे (९३.८०), पोंधवडी (८५.०२), अंजनडोह (८१.११), मोरवड (८८.५८), विहाळ (८८.८८), मांजरगाव (८५.१२), टाकळी (८१.०८), कात्रज (८४.८८), पोमलवाडी (८५.८५), कोंढार चिंचोली (८३.०५), खातगाव(८४.५८), पारेवाडी (८६.७७), गोयेगाव (५२.८९), रिटेवाडी (९२.७४), सोगाव (८२.५१), वाशिंबे (८४.६८), कुंभारगाव (६४.६२), भिलारवाडी (९४.०२), हिंगणी (८६.६७), देलवडी (८३.४३), दिव्हेगव्हाण (८५.२९), जिंती (७८.८०) अशा पध्दतीने प्रत्येक गावातुन मतदानाची टक्केवारी मतदान झाले आहे.