बावीस वर्षाच्या अखंड देश सेवा केल्याबद्दल पवार यांचे मुळ गावी जंगी स्वागत व सन्मान
करमाळा समाचार
भारतीय सेनेमध्ये अखंड बावीस वर्ष सेवा करून सुभेदार पदावर सेवानिवृत्त होत असलेल्या सचिन पवार यांचा आपल्या मूळ गावी फोफळज येथे भव्य स्वागत व सन्मान करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण गाव तयारी लागले आहे. सचिन पवार यांच्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा…

कार्यकाल-
2002-2007 : ग्वाल्हेर(मध्यप्रदेश)
2007-2013:
आंबाला(हरियाणा)
2013-2016:
श्रीनगर(जम्मु काश्मीर)
2016-2018:
पठाणकोट(पंजाब)
2018-20:
गोपालपुर(ओरिसा)
2020-21
पंजाब
2021-24
गोपालपुर(ओरिसा)

महत्वपूर्ण कामगिरी
2007- आतंकवादी हल्ल्यापासुन
ऩरोरा पावर स्टेशनला एअर डिफेंस देण्यात यश.
2014-श्रीनगर मधे ऑपरेशन मेघराहत मधे पुरग्रस्तांना वाचवण्यात महत्वपुर्ण कामगिरी
2016-जम्मु काश्मिर मधे सर्जिकल स्ट्राइक च्या वेळी तंगधार मधे एअर डिफेंस देण्यात यश
2020-एअर स्ट्राईक च्यावेळी ऑपरेशन जाफरान मधे महत्वपूर्ण भुमिका
2020-21
ट्रेनिंग सेंटर मधे कोरोना काळात निरंतर प्रशिक्षण देण्याचे काम
2022-उत्तराखंड मधे ऑपरेशन कामयाब मधे भाग घेवुन चायना बॉर्डर वर एअर डिफेंस देण्याचे काम
2023 चिफ ऑफ आर्मी स्टाफ कडुन प्रशंसा पत्र देवुन गौरवण्यात आले.
Army Air Defence मधे गन,मिसाइल आणी रडार चे उत्तम प्रशिक्षण दिल्याबद्दल GOC training Commad यांच्याकडुन प्रसंशा पत्र
22 ऑक्टोबर 2002 ला भरती आणी 31 ऑगस्ट 2024 ला रिटायरमेंट
22 वर्षे देशसेवा करताना मला माझ्या कुटुंबाची बहुमुल्या साथ दिली. त्यामध्ये आईवडिल-वयाच्या 19 व्या वर्षी काळीज मोठं करुन मला देशसेवेसाठी सुपुर्द केले व पुत्रसहवासाचा त्याग केला. भाऊ आणि बहीण- माझ्या गैरहाजेरीत आई वडिलांची संपुर्ण जबाबदारी आणी काळजी घेवुन माझी चिंता दुर केली. पत्नी-2008 पासुन सावली प्रमाणे माझ्या सुखदुखा:त खंबीर पने साथ देवुन माझ्या आर्धांगिनीची भुमिका पार पाडली.
– सुबेदार (TIGM)
सचिन पवार.