काकानगरी येथे पहिल्या गणेश जयंती निमित्ताने तहसिलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते आरती
करमाळा समाचार
शहरातील कुंभारवाडा परिसर व नव्याने उभारण्यात आलेल्या काका नगरी या ठिकाणी पहिल्यांदाच गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. सुरुवातीला गणपतीला अभिषेक करुन भाविकांना दर्शनासह महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.
यावेळी काका नगरी येथील मंडळांनी सर्वधर्मसमभाव ही भावना जपत असल्यामुळे त्यांचे कौतुक करत अशा प्रकारचे उपक्रम सर्व भागात राबवण्यात आले पाहिजे अशी अपेक्षा यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी व्यक्त केली. या ठिकाणी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पहिल्यांदाच गणेश जयंती सारखा उपक्रम या ठिकाणी राबवताना शेकडो भक्तांना महाप्रसादाचा लाभ यावेळी घेता आला.
यावेळी माजी नगरसेवक संजय सावंत, सचिन माहुले, विनोद पडवळे, सुरज परदेशी, मुक्तार पठाण, नितीन गुरव, लक्ष्मण यादव, गणेश शिंदे, लखन शेख, गुलाम सय्यद, कासम बागवान यासह मान्यवर उपस्थित होते. सदरचा कार्यक्रमाचे जय गणेश मित्र मंडळाचे आयोजन उत्कृष्ट झाल्याने यावेळी मान्यवरांकडून त्यांचे कौतुकही करण्यात आले.