करमाळासोलापूर जिल्हा

पुण्याहुन आवाटीत दर्शनाला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात ; बस १०० फुट रस्त्याच्या खाली घसरली

करमाळा समाचार

पुण्याहून आवटीकडे दर्शनासाठी जात असताना भाविकांची बस रस्त्यावरून खाली घसरून झालेल्या अपघातात जवळपास 23 भाविक होते. 19 किरकोळ स्वरूपाचे जखमी झाले आहेत. तर चार भाविकांना मोठी दुखापत झाली आहे. त्यांना करमाळा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनेक दिवसांपासून कोर्टी ते आवटी या रस्त्याचे काम सुरू असून वीट परिसरात रस्ता जवळपास पूर्ण झालेला आहे. या रस्त्यावरून वेगवान वाहतूक सुरू आहे. त्या ठिकाणी पळसवाडा परिसरात आज सकाळी एक खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्यावरून शंभर फुटापर्यंत खाली सरकत गेली. अपघात एवढा जोरदार होता की गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. वीट ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सर्व जखमींना तात्काळ करमाळ्याच्या दिशेने हलवण्यास मदत झाली.

सुदैवाने १०० फुट खासगी ट्रॅव्हल पलटी होऊन घसरत जाऊन देखील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. बस पुणे येथुन आवाटी दर्गा येथे जाण्यासाठी ही खासगी ट्रॅव्हल निघाली होती. पळसवाडा वीट येथे ( राशिन – करमाळा ) रोड वर सकाळी सात वाजता हा अपघात झाला आहे. चार जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून बाकीचे सर्व व्यवस्थित आहेत. या मध्ये दहा पुरुष, आठ महिला आणि पाच लहान मुले होती.

ads

घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या वीट गावचे गणेश काका ढेरे हे स्वतः ची फोर व्हीलर गाडी घेऊन पेशंट ला लगेच करमाळा येथे घेऊन गेले. तर दोन अॅब्लुनस पण लगेच आल्या. तसेच वीट गावचे जालिंदर जाधव, देविदास जाधव, दत्तात्रय भुजबळ, अक्षय भुजबळ, दत्तात्रय जगदाळे, बंडोपंत काका गुरूजी,अशोक चोपडे, तेजेश ढेरे इत्यादी मदतीला धावले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE