मच्छिमार खुन प्रकरणातील आरोपीला बेड्या ; करमाळा पोलिसांची मोठी कामगिरी
करमाळा समाचार
केम ता. करमाळा येथील मच्छीमारांचा सांगवी क्रमांक दोन शिवारात अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणाने जीवे ठार मारले होते. सदरचा प्रकार दि २ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला होता. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी संबंधित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. महेश राजेंद्र शिंदे वय ३३ रा. केम ता. करमाळा असे मयत युवकाचे नाव होते. तर विठ्ठल धोत्रे यास पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, केम ता करमाळा येथील शिंदे बंधू हे मच्छिमारी करिता सांगवी क्रमांक दोन याठिकाणी जात असत दोघेही केम येथे राहण्यास होते. मागील दोन महिन्यापूर्वी मयत महेश याची पत्नी प्रसुतीसाठी माहेरी गेल्यानंतर महेश हा सांगवी क्रमांक दोन या ठिकाणी राहू लागला व त्याचा भाऊ मनोज रोज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन मच्छीमार इस मदत करत होता. मासे घेऊन दोघेही भाळवणी व इतर ठिकाणी विक्री करत असत.

दि २ रोजी महेशच्या डोक्यावर, मानेवर व चेहऱ्यावर असे दोन ते तीन ठिकाणी घाव असल्याने संपूर्ण रूम मध्ये रक्त पसरलेले होते. त्यानंतर पहाटे ५ नंतर मनोजने आरडाओरडा करून शेजारी बोलवले व सदर घटना पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली व पुढील तपासाला सुरुवात केली होती पण हाती काय लागले नव्हते.
पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान तपास केला त्यावेळी सदर आरोपी मिळुन आला आहे. विठ्ठल धोत्रे हाच संशयित आरोपी असून पोलिसांनी त्याचा शोध घेतला आहे. अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करमाळा पोलीस करीत आहे.