अवैध वाळु वाहतुक करताना पोथऱ्याच्या दोघांवर कारवाई ; टॅक्टरसह मुद्देमाल ताब्यात
करमाळा समाचार

22/06/2021 रोजी रात्रौ 12:30 वा. चे सुमारास मौजे पोथेर ता.करमाळा येथील पोथरे ते ढेकळे वस्ती कच्या रस्त्यावर वाळु वाहतुक करताना दोघांसह 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तर पोथरेच्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी 4,00,000/- एक निळया रंगाचा टॅक्टर क्रमांक एम एच 45 एफ 1711 व त्यामागे एक दोनचाकी डंपिंगट्रॉली मध्ये 10,000/- एक ब्रास वाळू असे एकुण ४ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. सदरची कारवाई करमाळा पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली , आकाश भोजणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
दि. 22/06/2021 रोजी रात्रौ 12:30 वा चे सुमारास मौजे पोथेर ता.करमाळा येथील पोथरे ते ढेकळे वस्ती कच्या रस्त्यावरून चालक रविंद्र सुभेदार झिंझाडे सोबत महेश अशोक झिंझाडे यांनी त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये शासनाचे कोणतीही पास परवाना,रॉयल्ट्री नसताना अवैध्य रित्या वाळू ही टॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून त्याची वाहतूक करीत असताना मिळाला आहे म्हणून सदरच्या दोघांवर भादवि कलम 379,34 पर्यावरण संवर्धन अधिनियम कायदा 1986 चे कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
