आदिनाथ कारखान्याची सुनावणी लांबणीवर ; पुढची सुनावणी 17 तारखेला
करमाळा समाचार -संजय साखरे
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रिया ला स्थगिती देण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी होणार होती. परंतु , ही सुनावणी पुण्याच्या डी .आर डी कोर्टाने 17 जून पर्यंत पुढे ढकलली आहे.

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसवणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून निविदा मागविण्यात आली होती. यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो ग्रुप ला हा कारखाना पंचवीस वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.
मात्र भाडे तत्वाचा करार अद्यापही पूर्ण झाला नसल्याने आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास विरोध करणारी याचिका पुण्याच्या डीआरडी कोर्टात कारखान्याकडून दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी 17 तारखेला होणार असल्याचे समजते.
