करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आदिनाथ निवडणुकांमध्ये बागल ठरणार किंगमेकर ; गटासाठी एक फायदा असाही

करमाळा समाचार – विशाल घोलप 

आदिनाथ कारखाना अडचणीत आल्यानंतर बागल गटावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. बागल यांच्यामुळेच कारखाना अडचणीत आल्याचे सांगण्यात आले. याचा फटका बागलांना विधानसभेतही बसला. त्यामुळे बागल यांनी यंदाच्या निवडणुकांमधून माघारही घेतली आहे. पण जरी माघार घेतली असली तरी निवडणुकीचा निकाल हे बागलच ठरू शकतात असे चित्र सध्या दिसून येऊ लागले आहे. विशेष म्हणजे विरोधी गटाकडून बागलांवर टीका करणे टाळले जात आहे. बागलांचा मतदार स्वतःकडे खेचण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

तालुक्यातील मातब्बर असलेल्या बागल जगताप व पाटील गटाने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सत्ता उपभोगलेली आहे. त्यामुळे सदरच्या कारखान्यांमध्ये त्यांचे समर्थक व त्यांना मानणारे सभासद मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. कारखान्याच्या निवडणुकांमध्ये सदरचे सभासद मतदार निर्णायक भूमिका घेतात. यंदाच्या निवडणुकांमध्ये बागल यांनी माघार घेतलेली दिसून येत आहे. तर जगताप व पाटील एक साथ असल्याने त्यांचे पारडे जड दिसत आहे.

बागल यांनी माघार घेतल्यानंतर मतदारांना अद्याप कोणत्याही प्रकारचे आवाहन केलेले नसले तरीही सदरच्या निवडणुकांमध्ये बागल यांचा पघडा असल्याचा दिसून येत आहे. बागल यांचे समर्थक सभासद कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार त्याचा या ठिकाणी लाभ होताना दिसणार आहे. त्यामुळे बागल सध्या निवडणुकीत सक्रिय नसले तरी निवडणुकांचा निकाल मात्र बागल ठरवतील अशाच उमेदवाराचा होऊ शकतो अशी शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे कारखाना कोणाच्या जवळ द्यायचा हा निर्णय ऐनवेळी बागल घेऊ शकतात असे दिसून येत आहे.

ads

एक फायदा असाही …

आदिनाथ निवडणुकांमध्ये बागलां व्यतिरिक्त माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही माघार घेतली आहे. पण ते संजीवनी पॅनलचे पाठीराखे म्हणून काम पाहत आहेत. तर बागल यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. तालुक्याची कोणतीही निवडणूक असली तरी कारखाना अडचणीत आल्याचे खापर हे बागलांवर फोडणारे नेते यंदा मात्र यंदा बागलांवर टीका करण्याचे टाळत आहेत सध्या असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे बागल यांनी माघार घेत विरोधकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. याशिवाय कारखाना कोणाच्याही ताब्यात गेला तरी ती जबाबदारी त्याची असल्याने शांत राहणे पसंत करीत आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE