एकवीस ग्रामपंचायतीवर उद्यापासुन प्रशासक ; अनेकांच्या आशेवर विरजन
प्रतिनिधी- करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची मुदत २९/८/२० रोजी संपत असल्याने त्यावर प्रशासनाच्या वतीने प्रशासक म्हणुन शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका शक्य नसलेल्या ठिकाणी कोणालाही नियुक्ती न देता शासकीय कर्मचाऱ्यालाच नियुक्ती देण्याचे ठरल्यानंतर तालुक्यातील एकवीस ठिकाणी कर्मचारी नेमण्यात आले आहेत याबाबतचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी काढले आहेत.


तर ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सरपंचाचे सर्व अधिकार असणार आहेत. ज्या दिवशी ग्रामपंचायतीची मुदत संपते त्या दिवशी पासुन हे अधिकारी कामकाज बघायला सुरुवात करतील. तर त्यांनी त्या पदाचा गैरवापर केल्यास त्यांना पदावरुन हटवण्याचे सर्वस्वी अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी राखुन ठेवले आहेत. तसेच करमाळ्यासह आठ तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतीची मुदत ऑगस्ट पर्यत संपत आहे. त्यावरील अधिकारीही आजच जाहीर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायती व प्रशासक पाहण्यासाठी येथे क्लिक करा..