नागराज मंजुळेंनंतर पुन्हा करमाळ्याच्या मंगेश बदर यांचा राज्यभर डंका ; ‘मदार’ सिनेमाला मिळाले पाच पुरस्कार
करमाळा समाचार
लहानपणापासून दुष्काळ बघत वाढलेल्या तरुणाने गावाकडील पाण्यासाठी संघर्षावर बनवलेल्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाची थाप मिळाली आहे. घोटी ता. करमाळा येथील दीर्घ लेखक दिग्दर्शकाच्या ‘मदार’ या चित्रपटास आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले आहे. अशी कामगिरी करणारे बदर हे नागराज मंजुळे नंतर दुसरे दिग्दर्शक ठरले आहेत. २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाच्या संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट म्हणून मदारची निवड झाली आहे.
मंगेश महादेव बदर वय ३६ रा. घोटी ता. करमाळा असे त्या युवा लेखक दिग्दर्शकाचे नाव आहे. मंगेश यांचे संपुर्ण शिक्षण हे करमाळ्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात झाले. उजनी हा तालुक्याचा एक भाग आहे त्यामुळे सर्व तालुका समृद्ध आहे असे नाही. उजनी पट्टा सोडला तर करमाळा तालुक्याचा सत्तर टक्के भाग हा दुष्काळी पट्ट्यात मोडतो. पावसावरच याभागातील शेती अवलंबुन असते. दहिगाव उपसा सिंचन व सीना नदी मुळे सध्या जरी दिलासा मिळाला असला तरी लेखक बदर यांनी आपल्या गावाकडील दुष्काळी परिस्थिती सिनेमातुन मांडण्याचा प्रयत्न केला. आणी पंचांना हा विषय भावला आपल्या अडचणी पण पुरस्कार मिळवून देतील हे ही कोणी विचार करु शकले नसेल ते या सिनेमाने करुन दाखवले.
बदर यांचे शिक्षण गावाकडे तसेच करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा या ठिकाणी पुर्ण झाले. नंतर न्यू आर्ट कॉलेज अहमदनगर या ठिकाणी जाऊन रीतसर फिल्म मेकिंग चे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईला जाऊन जय मल्हार, एजंट राघव, चिडियाघर या टीव्ही मालिकांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले. त्यानंतर मिलिंद शिंदे यांच्यासोबत “रे राया” या चित्रपटाला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले. मिलिंद शिंदे सोबत काम करत असताना मंगेश बदर यांचे काम पाहून मिलिंद शिंदे प्रभावित झाले आणि त्यांना फिल्ममध्ये अभिनय करण्याचे आणि फिल्मसाठी सहनिर्माता म्हणून काम करण्याचे सहकार्य केले. २०१९ मध्ये मंगेश बदरने मदार या मराठी चित्रपटाला सुरुवात केली. मदार हा चित्रपट दुष्काळ भागातील पाणीटंचाईमुळे गावातील होणारे हाल आणि माणसा माणसांमध्ये होणारे तेड दाखवण्यात आले आहे. मदार हा संपूर्ण चित्रपट घोटी, करमाळा आणि केम या ठिकाणी चित्रित करण्यात आलेला आहे.
पुढेही सामाजीक विषयावर काम ..
मदार या चित्रपटाला महाराष्ट्र शासन अधिकृत २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये मराठी चित्रपट स्पर्धा विभाग यात निवड झालेली आहे. या विभागात महाराष्ट्रातून फक्त सात चित्रपट निवडले आहेत. त्यामध्ये मदार हा प्रथम क्रमांक वर आहे. २ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी यादरम्यान हा फेस्टिवल पुणे येथे होणार आहे. पुढेही ग्रामीण भागातील तरुणांच्या समस्या, शिक्षण , शेतकऱ्यांच्या समस्या यावर आधारित चित्रपट बनवणार आहे. यासाठी लेखन चालू आहे लवकरचपुढील चित्रपट करणार आहेत.
– मंगेश बदर, लेखक दिग्दर्शक “मदार ”
एकाच सिनेमाला पाच पुरस्कार..
महाराष्ट्र सरकारचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट म्हणून “मदार” हा पुरस्कार पटकावून या चित्रपटाने पिफ च्या आंतरराष्ट्रीय चित्रपटावर नाव कोरले. तर उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मंगेश बदर, उत्कृष्ट अभिनेता मिलिंद शिंदे, उत्कृष्ट अभिनेत्री अमृता अगरवाल, उत्कृष्ट छाया लेखक आकाश बनकर आणि अजय भालेराव असे पाच पारितोषिक मिळाले आहेत. उत्कृष्ट चित्रपटासाठी पाच लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले.
After Nagraj Manjule, Mangesh Badar of Karmala again ran across the state; ‘Madar’ movie won five awards