करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अजिनाथ शंकरराव पाटील (नाना)यांचे ९३व्या वर्षी निधन ; अष्टपैलु व्यक्तीमत्व हरपल्याने शोक व्यक्त

करमाळा


बिटरगावं वा येथील अजिनाथ शंकरराव पाटील (नाना)यांचे ९३व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्च्यात ४मुले ३मुली व सुना नातवंडे असा परिवार आहे. नानांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती १९६७ ते१९७२ दरम्यान उपसभापती भूषवले आहे. तसेच बिटरगावं वा चे सरपंच व खरेदी विक्री संघाचे संचालक व बिटरगाव सोसायटी चे चेअरमन अशा विविध पदावर काम केले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ शिक्षक नंतर पोलीस पाटील पदी काम केले. या अष्टपैलू व्यक्तीमत्वच्या जाण्याने या भागावर शोककळा पसरली आहे. तसेच ते देशभक्त नामदेवराव जगताप यांचे राजकीय सहकारी म्हणून परिचित होते. ते माजी राज्यमंत्री दिगंबररावजी बागल यांच्या बहिणीचे सासरे होते. तर करमाळा कृषी उत्पन बाजार समिती करमाळा संचालक कुलदीप पाटील व प्रगतशील बागायतदार महेंद्र पाटील व झोनल ऑफिसर बॅकं ऑफ महाराष्ट्र आंनदराजे पाटील यांचे आजोबा होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE