जाहिर प्रचार संपला असला तरी, सोशल मीडिया वरून प्रचाराचा धुराळा जोरदारपणे सुरूच
केत्तूर (अभय माने)
विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचाराची धामधुम 18 नोव्हेंबर रोजी संपली असली,तरी सोशल मीडियावर प्रचाराचा धुमाकूळ चाललेला दिसून येत आहे. उमेदवार शेतकरी, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यापेक्षा मोबाईल वरील व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम तसेच स्टेटस या समाज माध्यमाचा प्रभावी वापर करून जोरदार प्रचारपणे प्रचार करताना दिसत आहेत.
एकविसाव्या शतकातील वाढत्या तंत्रज्ञानाच्या प्रभावाने निवडणूक थेट परिणाम केला जात आहे. उमेदवारांचा प्रचार सभा,राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा, पदयात्रा, रॅली यांचे यूट्यूब च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले गेल्याने मतदारांना आपल्या उमेदवारांची, नेत्यांची भाषणे घरबसला ऐकायला मिळत आहेत.
सध्या जाहीर प्रचार संपला असला तरी, उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते मोबाईलवर उमेदवाराचे मतदानाविषयी आवाहनाचे व्हिडिओ तसेच इतर व्हिडिओ सध्या जोरदारपणे व्हायरल करीत आहेत, तसेच मोबाईलवर्ती स्टेटसही ठेवत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बदलत्या तंत्रज्ञानानुसार डिजिटलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची स्मार्ट पद्धत अवलंबित अवलंबिली जात आहे.
25 – 30 वर्षांपूर्वी निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवार व उमेदवार व त्याच्या कार्यकर्त्यांना मतदारापर्यंत प्रत्यक्ष /समक्ष पोहोचण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यावेळी जाहीर सभा, बैठका, कॉर्नर सभा तसेच नातेवाईकांच्या माध्यमातून उमेदवाराचा प्रचार चालत होता. त्यामुळे उमेदवारासह कार्यकर्त्यांची मोठी दमछाक होत होती. त्याकाळी बैलगाडी, दुचाकी, टेम्पो, जीप, ट्रक अशा वाहनातून गावोगावी लौऊड स्पीकरच्या माध्यमातून घोषणा देत, गाणी म्हणत तसेच विविध प्रकारच्या पथनाट्याच्या माध्यमातून प्रचार केला जात असे. निवडणुका आल्या की, गावोगावी घराच्या भिंतीवर उमेदवाराचे नाव व चिन्ह रंगविले जायचे. झेंडे,बिल्ले अशा प्रकारच्या प्रचार साहित्याचा वापर होत होता आणि तो घराघरात पोहोचला जात असे. परंतु सध्याच्या आधुनिकीकरणाच्या काळात हे सर्व मागे पडलयाचे वेळोवेळी दिसून येते.
सध्याच्या काळात सोशल मीडियावरून आरोप, प्रत्यारोप गाजत आहेत. तसेच नेत्यांचे जुने नवे व्हिडिओ मतदारांची करमणुकही करीत आहेत.
मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास यावर्षीपासून प्रतिबंध करण्यात आला आहे, त्यामुळे मतदारांना मतदान करतानाचा व्हिडिओ (छायाचित्रण) करता येणार नाही. तसे दिसून आल्यास त्या मतदारांवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे मतदान करतानाचे व्हिडिओ (छायाचित्रण) यावेळेस दिसणार नाहीत.तशीच कोणत्याही समाजाचा अथवा व्यक्तींच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट, कमेंट्स, व्हिडिओ, स्टेटस फॉरवर्ड करू नयेत यावर पोलिसांची बारीक नजर आहे .