करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

‘लाडकी बहिण’ योजनेच्या हेतुला सत्ताधारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडुन हरताळ फासण्याचा प्रयत्न

करमाळा समाचार

शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सरकारकडून मोठा गाजावाजा होत असला तरी कार्यकर्त्यांकडून त्याच्या हेतूलाच हरताळ फासण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. ‘फुकटच्या दीड हजाराचा’ उल्लेख करत सत्ताधारी पक्ष सोडून इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना हिणवले जात असल्याचे दिसून येत आहे. मुळातच सदरची योजना निवडणूक डोळा समोर आणली गेल्याचीही चर्चा आहे. त्यात कार्यकर्तेच विरोध ओढावून घेत आहेत.

एखादी योजना सरकारने आल्यानंतर सदर योजनेचा लाभ केवळ एका गटात पुरता किंवा पक्षापुरता नसतो. त्यामध्ये प्रत्येक जण पात्र लाभार्थी होऊ शकतो. एकदा निवडणुका झाल्या की सर्व एका छताखाली येऊन काम करावे अशी माफक अपेक्षा राजकारणी तसेच कार्यकर्त्यांकडून सामान्य लोकांना असते. परंतु काही कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजनेचा फज्जा उडवण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे.

सरकारने ज्या उद्देशाने लोकांसाठी महिलांच्या मतांवर डोळा ठेवत निवडणुकीच्या पुर्वी ही योजना आणली आहे. त्याच नियोजनाला हातभार लावण्यापेक्षा स्वतःला कट्टर म्हणून घेणारे कार्यकर्ते समाज माध्यमातून विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना हिणवत आहेत. यामुळे समाजात दुसराच संदेश जात आहे.

ads

समाज माध्यमात आलेल्या प्रत्येक चुकीच्या मेसेजला त्याच पद्धतीने उत्तरही मिळू लागले आहेत. जे लोक सरकार विरोधी वक्तव्य करत नव्हती ते लोक सुद्धा आता अशा पद्धतीच्या मेसेजवर बोलते होऊ लागले आहेत. अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना उघडपणे विरोध होत असतानाही पक्षातील वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांकडून कसलीही समजूत घातली जात नाही. यामुळेच पक्षांसह पदाधिकाऱ्यांना याचा फटका बसू शकतो.

 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE