तालुक्यातील दुसरा मोठा गट धक्का देण्याच्या तयारी ; तालुक्यात राजकीय भुकंप
करमाळा समाचार
यंदाच्या दिवाळीत शिंदे गटात मोठी खळबळ उडाली असून सुरुवातीला जगताप गटानी राम राम ठोकल्यानंतर आता सावंत गट ही वेगळ्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक झटके शिंदे गटाला बसत चालल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. जगताप नंतर सावंत गट भुमिका बदलण्याच्या तयारीत असल्याने हा मोठा हादरा मानला जात आहे. उद्या साडे दहा वाजता सावंत आपली भुमिका जाहीर करणार आहेत.
तालुक्यात सर्वात आधीपासून संजयमामा शिंदे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत असलेला सावंत गट सध्या नाराज असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून सावंतगट वेगळी भूमिका घेणार असे चर्चा सुरू होती. परंतु सावंत वेगळ्या भूमिकेकडे का वळाले व त्यांची त्यामागे कारणे काय आहेत याबाबत अद्यापही माहिती मिळवून आलेली नाही. पण लवकरच ते भूमिका जाहीर करणार आता हे नक्की झाले आहे.
तालुक्यातील प्रमुख गट सोडले तर त्यानंतर सर्वात मोठा गट म्हणून सावंत गटाची ओळख आहे. करमाळा नगरपरिषद व ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद मध्ये सावंत गटाच्या पाठिंबाला अधिक महत्त्व असून मराठा समाज व तालुक्यात त्यांचे असलेले वैयक्तिक संबंध यामुळे सावंत गटाच्या भूमिका मोठे महत्त्व प्राप्त होते. जगताप यांनी नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता सावंत यांनीही राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. या संदर्भात उद्या पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती आहे. त्यामध्ये ते आपला पाठिंबा जाहीर करतील तेही पाटील यांच्या कडे जातील अशी सुत्रांची माहीती आहे.