आठ महिण्यानंतर तहसिलदारपदी ठोकडे यांची नेमणुक ; पण ट्विस्ट कायम
करमाळा समाचार
करमाळा तहसीलदार समीर माने यांची बदली झाल्यानंतर तब्बल आठ महिने रिक्त असलेल्या पदावर प्रभारी म्हणून नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले. तर आता या पदावर अतिरिक्त कार्यभार म्हणून श्रीमती शिल्पा ठोकडे यांची नेमणुक करण्यात आली. पण सदरची नियुक्ती किती काळ असेल हे सांगणे कठीण आहे.

सदरचा पदभार हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. त्या सध्या तहसीलदार तथा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपुर मळा जि. सोलापूर काम पाहत आहेत. त्यांच्याकडे हा अतिरिक्त चार्ज देण्यात आला आहे. मुळातच येणाऱ्या निवडणुका लोकसभा होऊ शकतात. त्यादरम्यान शासनाकडून संबंधित पदभाराबाबत काय निर्णय होईल यावरही लक्ष लागून राहिले आहे.

श्रीमती ठोकडे या मूळच्या कुर्डूवाडी भागातील असून त्या माढा लोकसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार सदर निवडणुकी वेळी राहील का? असाही प्रश्न आहे. त्यामुळे सध्या त्यांची नियुक्ती निवडणुकीपर्यंत अतिरिक्त केली असावी निवडणुका नंतर पुन्हा एकदा ठोकडे यांची करमाळा येथे कायम पदभार मिळण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी सदरचा चार्ज हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे.