घोलप यांनी केलेल्या या कामाचे सीनाकाठावरुन कौतुक ; पुरस्काराने होणार गौरव
करमाळा समाचार
तालुक्यातील श्री आदिनाथ महाराज देवस्थान व यशकल्याणी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ या वर्षीचा सीनारत्न पुरस्कार धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय घोलप यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, संपूर्ण पोशाख , शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करून गौरविण्यात येणार आहे. सदरचा सन्मान दि ३ रोजी दुपारी दोन वाजता संगोबा येथे दिला जाणार आहे. घोलप यांनी संगोबा येथील पाणी गळती थांबवण्यात योगदान दिल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

घोलप यांच्या कामाची दखल घेऊन हा सत्कार समारंभ यशकल्याणी सेवाभावी संस्था कावळवाडी चे संस्थापक अध्यक्ष गणेश करे व ज्ञानदेव गायकवाड यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार समीर माने, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल हिरे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गट विकास अधिकारी मनोज राऊत, जिप सदस्या राणी वारे , संतोषकुमार गुगळे, श्री संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल शिंदे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देवस्थान चे सचिव राजेश गायकवाड यांनी दिली आहे.
यावेळी बोरगावचे मा. सरपंच विनय ननवरे, सरपंच प्रमोद गायकवाड, सीना संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रकाश मामा कोळेकर, मेजर सूर्यकांत कुंभार, करंजे ग्रामपंचायत सदस्य शहाजी ठोसर, ऍड शशिकांत नरुटे, पोटेगावचे सरपंच अप्पासाहेब नाईकनवरे, बालेवाडी चे सरपंच रामभाऊ नलवडे, तरटगावचे सरपंच डॉ अमोल घाडगे , बोरगाव दूध संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर भोगल, निलज दूध संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ गायकवाड, करंजे चे आदिनाथ कारखान्याचे संचालक पोपटराव सरडे, पोथरे चे सरपंच हरिभाऊ झिंजाडे, देवीचा माळचे उपसरपंच दीपक थोरबोले, खांबेवाडी चे ग्रामपंचायत सदस्य विजय खटके, अशोक गोफणे, सुशील नरुटे, निलज ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड व संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
