सर्वोदय प्रतिष्ठान आयोजीत कार्यक्रमात – माईंड पॉवर ट्रेनर डॅा. दत्ता कोहिनकर यांचे मार्गदर्शन
करमाळा समाचार
सर्वोदय प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवनिमित्त बौद्धिक व्याख्यानमालेसाठी पहिले पुष्प गुंफताना पुणे येथील प्रसिद्ध माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी सांगितले की, मानवी मन अमर्याद शक्तीचे प्रतीक आहे व आयुष्यामध्ये सकारात्मक विचार ठेवल्यास जीवन यशस्वी होऊ शकते व आपल्याला जीवनातील सर्व गोष्टी प्राप्त करता येतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी राजकुमार दोशी हे होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार सचिव अमरजीत साळुंखे व सदस्य सागर पुराणिक यांनी केला. रसिक स्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण, गणेश करे पाटील, प्राचार्य मिलिंद फंड सर, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वोदय प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेतील यावर्षीचे दहावे वर्ष असून यावर्षीचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. दत्ता कोहिनकर यांनी जीवनातील अनेक रहस्यमय व यशस्वी पैलू सांगितले. आपण मनाची शक्ती सकारात्मक ऊर्जा आणि उच्च ध्येय ठेवल्यानंतर जीवन यशस्वी होऊ शकते तसेच चांगल्या विचाराने माणूस तणावापासून दूर होतो. यावेळी त्यांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवली व सभागृहातील सर्व श्रोत्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे सर, प्रस्ताविक सर्वोदयाचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वोदय प्रतिष्ठानचे सदस्य प्रसाद कुलकर्णी, सुधीर माने, उमाकांत जाधव, अजित कणसे प्रा. अक्षय घुमरे, अमोल रणशुर, वैभव पोतदार , सुनील पवार, संतोष कांबळे, गोपाल वाघमारे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

