ॲट्रोसिटी तसेच जीव मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या गंभीर गुंह्यात संशयीताला अटकपुर्व मंजुर
बार्शी प्रतिनिधी
बार्शी येथील माजी नगरसेवक नाना वाणी यांचे बंधू विशाल वाणी यांच्यावर आयपीसी कलम 307, 324, 326, 504, 506, 34 आर्म Act. 4 ,25 महाराष्ट्र पोलीस Act.135 ॲट्रॉसिटी Act.3(2)(v),3(1)(r)(s) & 3(2)(va) प्रमाणे दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी साडेनऊच्या आसपास वरील कलमा प्रमाणे बार्शी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.

त्यामध्ये एकूण सात संशित आरोपी वरती गुन्हा दाखल होता. त्यामधील चार आरोपीना अटक झाली होती. उर्वरित संशित आरोपी हे फरार होते. फरारी आरोपी यांचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. फरारी आरोपींनी उच्च न्यायालय मुंबई येथे अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता.

संशयित आरोपींवरती कोयतेने, तलवारीने, तसेच लाटीकाटीने हाणमार केल्याबद्दल व जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दलचा आरोप होता. आरपीच्या वकिलांनी माननीय उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद सादर करून आरोपीस अंतरीम जामीन मंजूर केला
आरोपीतर्फे एडवोकेट भाग्यश्री अमर शिंगाडे- मांगले व अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.