ग्राहक दिन पंधरवाड्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे प्रबोधन ; दिव्यमराठीचे पत्रकार घोलप यांचे सखोल मार्गदर्शन
प्रतिनिधी | करमाळा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा युनिट च्या वतीने 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवडा श्री कमलादेवी कन्या प्रशाला करमाळा येथे साजरा करण्यात आला.

24 डिसेंबर 1986 रोजी भारतीय ग्राहक हक्क कायद्याला राष्ट्रपतींची सही होऊन मंजूरी मिळाली. तेव्हापासून 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. करमाळा ग्राहक पंचायत च्या वतीने विद्यार्थ्यी ग्राहक प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून दैनिक दिव्य मराठी चे तालुका प्रतिनिधी तथा ग्राहक पंचायत चे प्रसिध्दीप्रमुख मा. विशाल घोलप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलत असताना घोलप यांनी ग्राहक, पत्रकारीता आणी सामान्य जीवनातील मुला मुलींसमोर येणाऱ्या अडचणी आणी त्यातुन मार्ग यावर विचार व्यक्त केले.


पुढे बोलताना म्हणाले की, फसवणारे आपल्याला फसवण्यासाठी बसलेले आहेत आपण अजुन किती दिवस फसणार आहोत. समाज माध्यम असतील किंवा मोबाईलमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आभ्यासशिवाय मोबाईल वापर जागरुकतेने गरजेचे आहे असे प्रतिपादन विशाल घोलप यांनी विद्यार्थ्यांसमोर सखोल पणे व्यक्त केले.
तर बाजार पेठेतील अनुचित व्यापार व खरेदी विक्रीतील त्रुटी आणि वस्तू व सेवेतील दोष आणि समस्या दूर करण्यासाठी करमाळा ग्राहक पंचायत चे सदस्य व्हावे असे आवाहन केले.
याकार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका शेलार मॅडम उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायचे अध्यक्ष ॲड. शशिकांत नरुटे, कोषाध्यक्ष भिमराव कांबळे, ग्राहक पंचायतचे कायदा सल्लागार मा. सदाशिव जाधव, माजी अध्यक्ष संजय हांडे, वर्ल्ड कॅम्प्टुरचे प्रमुख दिलीप क्षिरसागर सर तसेच कन्या प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थींनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. ॲड शशिकांत नरुटे यांनी केले तर सुत्रसंचालन मा. भिमराव कांबळे सर यांनी केले.