केळी उत्पादक संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर
चिखलठाण (प्रतिनिधी)
केळी उत्पादक संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून केळी उत्पादक संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संघाच्या वतीने पंढरपूर येथे निर्यातक्षम केळी परिसंवाद व राज्यस्तरीय दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केळी उत्पादक संघाचे तालुका अध्यक्ष वैभव पोळ यांनी केले आहे राज्यातील दूध उत्पादक कांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी संघाच्या वतीने राज्यस्तरीय दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पंढरपूर येथील संस्कार मंगल कार्यालय येथे या परिषदेत होणार असून या परिषदेला महाराष्ट्रभरातून शेतकरी प्रतिनिधी उपलब्ध उपस्थित राहणार आहेत करमाळा तालुक्यातील ज्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पोळ यांनी केले आहे यावेळी त्यांनी तालुका केळी उत्पादक संघाची कार्यकारणी जाहीर केली आहे.
तालुका उपाध्यक्षपदी नंदू जाधव (हिंगणी)तर सचिवपदी वैभव बोराडे (केडगाव) कार्याध्यक्षपदी गणपत घोगरे (सरफडोह ) तर कार्यकारणी सदस्य पदी रोहित लबडे आजिनाथ साखरे अतुल भोसले सोमनाथ झोळ श्रीकांत पडवळ आजिनाथ गव्हाणे नितीन शेटे आदित्य बडे यांची कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
