करमाळा तालुक्यातील एका नेत्याविरोधात कर्जत मध्ये बॅनरबाजी
करमाळा समाचार
तालुक्यातील पश्चिम भागातील एका मोठ्या नेत्याची कर्जत शहरांमध्ये अनैतिक कारस्थान करीत असल्याबाबत डिजिटल फ्लेक्स लागले असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे सदरचा नेता हा करमाळा तालुक्यातील मोठ्या पदावर काम केलेला असून कर्जत जामखेड परिसरात येणे जाणे असल्याने रडारवर आल्याचे दिसून येत आहे.
कर्जत येथे लावण्यात आलेल्या डिजिटलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. समाज माध्यमातून हा डिजिटल सर्वत्र फिरवला जात आहे. यावेळी सदर डिजिटल वर ‘हात चाळीत चाललाय कुठं’ असंही छापले आहे व अनैतिक कारस्थानाचा आरोप करण्यात आला आहे.
सदरचे आरोप हे अनैतिक संबंधातून की राजकीय द्वेशातून केले आहेत हे स्पष्ट झाले नसले तरी यातील चर्चा मात्र कर्जत शहरात व तालुक्यात जोरदार सुरू आहेत. यावेळी डिजिटल कोणी लावले याचा शोध घेण्यात आला पण संबंधित व्यक्ती मिळून आले नाहीत.
सदर डिजिटल वर कर्जत जामखेड चे आमदार यांच्या नावाचा उल्लेख करीत ते नावा रूपाला येत असताना तुमच्यासारख्या अनैतिक कारस्थानामुळे कर्जत जामखेडचे नेते, कार्यकर्ते व जनतेच्या मनात संभ्रम तयार होत आहे आशा आशयाचे व धडधडीत संबंधित नेत्याचे फोटो असलेले बॅनर झळकवले आहेत.