करमाळाकृषीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सावधान घोणस आळीसारख्या विषारी आळीचा करमाळ्यात प्रवेश ; एक शेतकरी दवाखान्यात दाखल

समाचार टीम

 

जामखेड – आष्टी परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर आता घोणस अळीसारख्या दिसणाऱ्या अळीचा करमाळा तालुक्यात ही प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे. वडगाव दक्षिण येथील एका शेतकऱ्याला या आळी मुळे आज दवाखान्यात भरती होण्याची वेळ आली आहे. संबंधित आळी अंगावर आढळून आल्यानंतर त्या आळीला बाजूला करेपर्यंत अंगावर काळा डाग आला व नंतर त्रास होऊ लागल्याने करमाळा येथील दवाखान्यात शेतकऱ्याला दाखल करण्यात आले आहे.

ऊस व गवतावर आढळणाऱ्या या विषारी अळीमुळे बाहेर तालुक्यातील बरेच जण आजारी पडत असल्याचे आपल्याला दिसून आले होते. पण आता ही आळी करमाळा तालुक्यातही प्रवेश केल्याने शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. मुळात संबंधित आळी चावली किंवा अंगावर फिरल्यानंतर होणाऱ्या त्रास हा उपचाराने बरा होऊ शकतो. पण वेळेत दवाखान्यात जाणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी मत व्यक्त केले आहे.

तालुक्यातील वडगाव येथील लक्ष्मण शिंदे हे सकाळी नऊच्या सुमारास शेतात उसाची पिका जवळ गेले असताना त्यांच्या उजव्या हातावर आळी फिरत असल्याचे दिसून आले आणि ज्या भागात फिरत होती. त्या भागावरच फक्त काळा डाग पडला. सदर अळी नीट पाहिली असता ती हिरवट रंगाच्या काटेरी स्वरूपाची आळी असल्याची दिसून आले. घोणस आळी सारखी ही दिसणारी आळी सोशल माध्यमातून सर्वत्र फिरत असल्याने लगेचच ती लक्षात आली. त्यामुळे शिंदे दवाखान्याकडे जाण्यापूर्वी त्यांच्या उजव्या हात व छातीचा भाग हा सुन्न झाल्याचा त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब करमाळा येथील डॉ. जाधव रुग्णालय गाठले त्या ठिकाणी उपचार घेत असताना त्यांना फरक पडल्याचे दिसुन आले आहे.

ads

सदर अळी चावल्यानंतर बऱ्याच जणांना असाह्य वेदना होऊन उलट्या व जुलाब होत राहतात. त्यामुळे वेळेवर दवाखान्यात जाणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यात इतर ठिकाणी ही आळी अद्याप तरी कुठे आढळून आलेली नाही. पण वडगाव सारख्या ठिकाणी ही आळी आढळल्याने तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. पण या आळीला भिऊन जाण्याची गरज नाही केवळ उपचार वेळेवर घेतल्यास हा आजार किंवा वेदना वेळेवर थांबू शकतात असे डॉ. रोहन पाटील जाधव यांनी सांगितले आहे.

 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE