सावधान चोर तुमच्या मागावर आहेत ; बॅंक परिसरात गाडी पंचर करुन एकाची बॅग लांबवली
करमाळा –
बँकांच्या बाहेर पाळत ठेवून चोरी करणारी टोळी सक्रिय असून यामध्ये युनियन बँकेपासून एकाची बॅग चोरट्यांनी पळवली आहे. सदर बॅगमध्ये सव्वा लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. सदरचे चोरटे हे बराच काळ बँकेच्या ओट्यावर तसेच परिसरात भटकत असलेले दिसले. यातून त्यांनी पाळत ठेवून एका पिकअप ची हवा सोडली व त्यानंतर ज्यावेळी चालक व मालक गाडीखाली उतरले त्यावेळी बॅग घेऊन संबंधित चोरट्यांनी पळ काढला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कायदे झाल्याचे दिसून आले.

काल दि १६ वार शनिवारी दुपारी १२ वा १५ वाजता अंजनडोह गावचे दिपक शेळके ( दुध डेअरी चेअरमन ) यांनी युनियन बँकेतुन दुध सभासदांच्या पगारी करण्यासाठी रोख सव्वा लाख रुपये काढले होते. चोर बाहेर पाळत ठेवूनच होते. त्यांनी आधी दिपक चेअरमन यांच्या पीकअपची हवा सोडली. आणि साईटला जाऊन बसले. दिपक आणि ड्रायव्हर आले पीकअप चालू केले थोड पुढे आले की ड्रायव्हर म्हणाले पीकप पंच्पर झालं त्या मुळे दोघं ही खाली उतरले. बॅग पीकअप मध्येच होती. लगेच अवघ्या पाचच सेकंदात बॅग चोरांनी पळवली.
त्यामुळे सध्या कुठेही जात असताना आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवणे गरजेचे आहे. मागील काही काळामध्ये अंगावर घाण टाकून लक्ष विचलित केले जात होते व चोरटे संधी साधून बँकेपासून अशा पद्धतीच्या चोऱ्या करत होते. पण आता नवीन नवीन शक्कल लढवली जात आहे. त्यामुळे पैशांनी भरलेली बॅग किंवा दाग दागिने असलेल्या बेगा पर्स या जपून प्रवास करावा.

