भारत जोडो अभियान सोलापूर जिल्हा बैठक १० ऑक्टोबरला
प्रतिनिधी | करमाळा
भारत जोडो अभियान ही प्रक्रिया गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया सुरू केली आहे. येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये धर्मांध आणि जातीयवादी शक्तींना दूर करून शिव-शाहू- फुले-आंबेडकर-अहिल्या-सावित्री यांच्या विचारांची सत्ता आणणे हा प्रमुख उद्देश आहे यानिमित्ताने आयोजीत भारत जोडो अभियान दि १० आक्टोबर रोजी तांदुळवाडी ता. माळशिरस येथे होणार असल्याची माहीती सम्नवयक ॲड. सविता शिंदे यांनी दिली.

देशामध्ये सध्या संविधान आणि त्यातील अधिकार नाहीसे करण्याचा घाट घातला आहे. नव्याने पुन्हा मनुस्मृति लागू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणत वाढली आहे. अल्पसंख्यांक, दलीत, आदिवासी वरील हिंसा वाढली आहे. धर्म आणि जातीयतेच्या नावाने हिंसा वाढली आहे. देशाची सामाजिक सुरक्षा, एकता आणि सलोखा असुरक्षित झाला आहे. या सर्व बाबीचा विचार करून जळगाव येथे दिनांक १ व २ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्रातील परिवर्तनवादी विचारांचे कार्यकर्ते एकत्र येऊन राज्यव्यापी कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनानंतर मतदार संघ निहाय कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाले आहेत. कार्यकर्त्यांना विविध विषयावर प्रशिक्षित करणे मतदारसंघाचे मॅपिंग करणे मतदार जागृती करणे इत्यादी कामे सुरू झाली आहेत.

या प्रक्रियेचा एक भाग म्हणून तसेच कार्यकर्त्यांना या भारत जोडो अभियानशी जोडण्याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक दि १० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत सगुना मंगल कार्यालय तांदूळवाडी तालुका माळशिरस येथे आयोजित करण्यात आली आहे. आपण सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे