करमाळा कृषी उत्पन्न बाजारसमीतीतुन मोठी बातमी ; पुणे विभागातुन आलेला निर्णय बागल गटासाठी नवीन उर्जा देणारा
करमाळा समाचार
करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप यांचे बाजार समितीचे सदस्यत्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कुंदन भोळे यांनी रद्द केले होते. त्यानंतर चिंतामणी जगताप यांनी सहनिबंधक कार्यालय पुणे यांच्याकडे दाद मागितल्यानंतर श्री भोळे यांनी दिलेल्या पद रद्द आदेशाला सहनिबंधक सहकारी संस्था पुणे विभाग संगिता डोंगरे यांनी स्थगीती दिली आहे. त्यामुळे चिंतामणी जगताप यांना दिलासा मिळाला आहे.

चिंतामणी जगताप यांच्याकडे नोंदणीकृत भूखंड असून त्यांनी त्याचे भाडे देखील भरलेले नाही. त्यामुळे समितीशी प्रत्यक्ष करार व थकबाकीदार असल्याने त्यांना अपात्र घोषित करून बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करणेबाबत शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी जिल्हा उपनिबंधक सह. संस्था सोलापूर यांचेकडे अपील केले होते. त्यावर सुनावणी देताना उपनिबंधक कुंदन भोळ यांनी चिंतामणी जगताप यांचे पद रद्द केले होते. सदरचा आदेश २१ ऑक्टोंबर २०२१ रोजी देण्यात आला होता.

त्यानंतर चिंतामणी जगताप यांनी पद पद्द केल्याबाबत पुढे दाद मागितली होती. सदर अर्जावर १ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी अर्जदार यांच्या वतीने ॲड दीपक देशमुख यांनी उपस्थित राहून म्हणणे मांडले. यावेळी चिंतामणी जगताप यांनी अर्ज केलेला भूखंड त्यांना कधीही मिळालेला नव्हता.
*वाशिंबेतील पोस्टमन पवार यांचा स्तुत्य उपक्रम ; शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याने होतेय कौतुक*
https://karmalasamachar.com/postman-pawars-commendable-initiative-in-washimbe-appreciating-the-farmers-going-to-the-dam/
सदरचा भूखंड हा महसूल प्राधिकरणाने रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घेतला असून त्याचा मोबदला देखील बाजार समितीला मिळालेला आहे. तरी चिंतामणी जगताप यांच्या बाजूने केलेल्या अर्जात तथ्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे २१ ऑक्टोंबर रोजी दिलेल्या आदेशाला विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे संगीता डोंगरे यांनी स्थगिती दिली आहे.