गणेशोत्सवानिमित्ताने आज रक्तदान शिबीर ; सहकार मित्र मंडळाचा उपक्रम
करमाळा समाचार
करमाळा शहरातील सहकार युवक मित्र मंडळ तेली गल्ली यांच्यावतीने गणेश उत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे. सदरच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. सदरचा कार्यक्रम श्री जगनाडे महाराज सभागृहात होणार आहे.

प्रत्येक वर्षी कोणते ना कोणते सामाजिक उपक्रम करून लोकहिताची कामे हातात घेणारे सहकार युवक मित्र मंडळ यांनी यंदा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सदरच्या उपक्रमात शेकडोंच्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे पत्रकार अण्णा काळे, दैनिक दिव्य मराठीचे विशाल घोलप, डॉ. रोहन पाटील, डॉ. अमोल घाडगे, डॉ. दीपक केवारे, डॉ. संकेत सावंत, डॉ. अनुप खोसे, डॉ. राजेश मेहता आदि उपस्थित राहणार आहेत.