करमाळासोलापूर जिल्हा

अंगणवाडी सेविका उषा अवचर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

करमाळाः

अंगणवाडी सेविका उषाताई अवचर या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या आहेत. आदर्शवत सेवा देणाऱ्या अवचर यांचा या सेवेनंतर सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी बालविकास प्रकल्प प्रशासनासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा यथोचित सन्मान करुन शुभेच्छा दिल्या.

सदरप्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी वेताळ माने, पर्यवेक्षिका जयश्री देशपांडे, सर्जेराव मोहोळकर, सिनेट सदस्य दिपक चव्हाण, नरेंद्रसिंह ठाकूर, ग्रामसेवक हरिभाऊ दरवडे, शांतीलाल झिंजाडे, रासपचे तालुकाध्यक्ष अंगद देवकते, शहाजी झिंजाडे, रामकृष्ण नायकोडे, संतोष भांड, प्रसाद कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अवचर यांनी प्रामाणिकपणे सेवा दिल्यामुळे नेहमीच समाधान मिळत राहिले. अशा भावना व्यक्त केल्या.

ads

तर पोलिस पाटील संदिप शिंदे-पाटील यांनी, कोणतेही काम आपण सेवा म्हणून करत असतो तेव्हा त्यातून एक वेगळा आनंद भेटत असतो, चांगले काम केल्याचे आत्मिक समाधान मिळत असते. माझ्या आईने खूप संघर्ष केला. सुरुवातीस शंभर रुपये महिना मानधनात बालवाडी शिक्षिका म्हणून काम केले. नंतर पोथरे येथून ढेकळेवाडी येथे रोज पायी चालत बारा वर्षे सेवा केली. तर पोथरे ते घारगाव (वस्ती) येथे वीस वर्षे पायी चालत सेवा केली. कमी मानधनावर नोकरी करुन देखील आम्हा सर्व भावंडांवर चांगले संस्कार केले, स्वाभिमान, आत्मसन्मान, संघर्ष या सर्व गोष्टींची आणि सकारात्मक विचारांची शिदोरी आम्हाला आईने दिली. असे सांगितले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीता शिंदे यांच्यासह मीरा नायकोडे, शामल रंदवे, माधुरी दळवी, ताई काळे, हवई काळे, बेबी ढवळे, लीला डेबरे, मनीषा खराडे, निर्मला पवार, योगिता शिंदे, वैशाली जोरी, शोभा झिंजाडे, वंदना आढाव, दीपाली रंदवे आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी योगिता शिंदे, शामल रंदवे, मीरा नायकोडे, हवई काळे, निर्मला पवार, नूतन शिंदे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पोथरे येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत सन्मान रणजित शिंदे-पाटील यांनी केले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE