चैतन्य महेश कुलकर्णी चा डिजीटल मार्केटिंग एक्सलन्स आवार्डने पुणे येथे सन्मान
करमाळा –
दि. २० आक्टोबर रोजी वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे आयोजित पदवीदान समारंभात चैतन्य कुलकर्णी मांजरगाव यास एवढया लहान वयात डिजिटल मार्केटिंगमध्ये उत्तुंग यश मिळवल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
चैतन्य यांनी संस्थेच्या वाढीसाठी आणि प्रगतीसाठी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल, ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती श्री उमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते Digital Marketing Excellence Award देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तो पुण्यामध्ये सध्या बी.सी.ए चे शिक्षण घेत आहे तसेच तो ऑनलाईन मार्केटिंग चे क्लास घेत असुन पुण्यातुन स्वतः ची मेटा टेक मॅनेजर ही ॲड एजन्सी चालवत आहे अनेक कंपन्यांच्या मेटा ॲड कँपीयन चालवत आहे.
तसेच डिजीटल क्षेत्रात विविध प्रोजेक्ट वर तो काम करत आहे. अतिशय कमी वयात या क्षेत्रात तो कार्यरत आहे. संस्थेच्या डिजिटल प्रगतीत चैतन्य यांनी केलेले कार्य आदर्श आहे आणि त्यांचे यश त्यांच्या मेहनतीचे फलित आहे. असे प्रतिपादन श्री. उमेश कुलकर्णी गुरूजी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
वास्तुशास्त्र व ज्योतिष शास्त्रातील विविध ६ पुरस्काराने श्री. महेश कुलकर्णी यांचा पुण्यात सन्मान
कार्यक्रमामध्ये ज्योतिष वास्तु विश्व संशोधन संस्था पुणे संस्थापक श्री. डॉ. उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचे कडून गेली १ वर्षा पासुन विविध विषयांचे अध्ययन करून या परीक्षांमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. वास्तुशास्त्राच्या वास्तु भुषण , वास्तुरत्न , या परिक्षामध्ये विशेषश्रेणी मिळविल्या बद्दल , तसेच लोलक विद्या विशारद , अंकशास्त्र विशारद परिक्षेत विशेष श्रेणी मिळविल्या बद्दल व वास्तुशास्त्रा च्या सहाय्याने केलेल्या लक्षवेधी कार्याबद्दल आणि ३० पेक्षा जास्त वास्तु व्हीजीट करून वास्तुशास्त्राच्या माध्यमातुन त्यांना केलेल्या मार्गदर्शन बद्दल मान्यवरांच्या हस्ते समारंभ पुर्वक सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र , पुणेरी पगडी , शाल , श्रीफळ देऊन एकुण ६ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.