केम मध्ये चार जणांवर गुन्हा दाखल ; प्रतिबंधीत क्षेत्रात फिरल्यामुळे कारवाई
केम प्रतिनिधी – संजय जाधव
केम ता. करमाळा येथे कंटेनमेंट झोन मध्ये मिळुन आल्या प्रकरणी चौघावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाचे पाश्वभुमीवर गणेश हजारे यांचे घर पठाण गल्ली, टिळक चौक या कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना रोगाचे गांभीर्य रहावे म्हणुन ही कारवाई करण्यात आली आहे.


या प्रकरणी केम पोलीस चोकिचे हवालदार सचिन देशमाने व पोलीस प्रशांत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादित म्हटले कि पोलीस शिपाई संतोष देवकर, पोलीस नाईक प्रशांत गायकवाड हे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गस्त घालत असताना, दिलीप कालीदास पवार, चंद्रकांत प्रकाश पवार, ऋषिकेश हरिश्चद्रं तळेकर, अक्षय सुहास सासवडे हे संचारबंदिचे काळामध्ये तोंडाला मास्क न घालता प्रतिबंध क्षेत्रामध्ये फिरत होते. त्यांना विचारपूस केली असता त्यानी समाधानकारक ऊत्तरे न देऊ शकल्याने यांचेवर भा.दवी कलम 188/269 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 518 साथीचे रोग प्रतिबंध अधि.1997 चे कलम 2, 3 , 4, अन्वय गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास हवालदार संतोष देवकर व पोलीस कर्मचारी प्रशांत गायकवाड करीत आहेत.