वडीलांचा खुन करुन पुरावा नष्ट करणाऱ्या दोन मुलांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
वडीलांचा घरात सततचा त्रास तसेच आईला मारहाण अशा प्रकारांना वैतागून दोन भावांनी आपल्याच वडीलांचा खुन केला असुन पुरावा नष्ट करण्यासाठी अंत्यविधीही उरकला होता. पण घटनेचा तपास करुन करमाळा पोलिसांनी खरे आरोपी समोर आणले आहेत.

07/04/2021 रोजी रात्रौ.10/30 वाजताचे सुमारास आई अविदा हिस मयत भैरु हे मारहाण करीत होते. यावेळी संशयीत निखील जगताप व अक्षय जगताप दोघे रा.वरकुटे (मुर्तीचे) ता.करमाळा यांनी संगणमत करुन मयत नामे भैरु भागवत जगताप वय 55 वर्षे रा.वरकुटे (मुर्तीचे) ता.करमाळा यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

आरोपी नामे निखील जगताप व अक्षय जगातप या दोघांनी भैरु जगताप यास जबरदस्तीने पकडून त्याचे दोरीने पाय बांधून त्यानंतर भैरु जगताप याचे गळया भोवती दोरीचा फास गुंडाळून तो आवळून त्यास फरपटत घराबाजूला असलेल्या झाडाजवळ घेऊन जाऊन पुन्हा त्याचे गळया भोवतीचा दोरीने फास आवळून त्यास जिवे ठार मारले आहे.
भैरु जगताप याचेे मरणाची कोणती ही खबर न देता लोकांना मरणाची खोटी माहिती देऊन मृतदेहाचा परस्पर अंत्यविधी करुन पुरावा नष्ट केला. त्यानंतर करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल जाधव, श्रीकांत हराळे आदिंनी कसु चौकशी केली त्यावेळी सदर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्या दोघांवर आपल्याच वडीलांचा खुन केल्याचे दिसुन आले. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.